ती माझ्या लाइफ मध्ये आली ती
एक ऍक्सीडेन्ट म्हणून
ती दिसायला मस्त होतीच
पण तिचा मूळ गुण म्हणा , अवगुण म्हणा
एन्जॉय लाईफ , घर तसे श्रीमंतांचे , एकुलती एक
स्वतःचे पाकीट कधी उघडायचे नाही.
मी पण तसाच सधन दोन कंपन्या नावावर,
मी २३ वर्षाचा असताना ती लाइफमध्ये आली ,
दोन वर्षाने माझ्यापेक्षा मोठी.
हळू हळू लक्षात आले हे काही
मॅरेज मटेरियल नाही.
आमची मैत्री खऱ्या अर्थाने खूप क्लोज सर्वच बाबतीत..
एक दिवशी माझ्या ऑफिसच्या पार्टीला आली ..
माझा लंडनचा मित्र पण होता खूप श्रीमंत
तिला सर्व काही सांगितले ..ती सॉलिड ‘ इंप्रेस ‘ झाली
हळू हळू माझ्या लक्षात आले.
ती माझ्या ऐवजी त्याचा जवळ जास्त जात होती.
तो पक्का चालू , भरपूर पैसे उधळत होता.
तो सहा महिन्यानी परत जाणार होता हे फक्त मला माहीत होते
बाकी कुणालाच नाही. एके दिवशी मी तिला पकडले
रंगेहात ….
खूप भांडण झाले.
ती म्हणाली तुझे तोड बघणार नाही ,
आपले ब्रेक अप
मी म्हणालो तू आधीच तुझ्या कृतीने दाखवले .
आमचे फोन बंद झाले.
भेटणे बंद ..चॅप्टर क्लोज .
बरेच दिवस झाले …खूप मोकळे वाटत होते
बऱ्याच गोष्टी घडून गेल्या होत्या.
दारावरची बेल वाजली .
दार उघडले…माझी होणारी बायको समोर
दरवाजात हाती .
मी माझे लग्न ठरवले. होते आधीच
तिच्या ब्रेकअप आधी.
मी पहिलीचा पतंग काटला ..
फक्त माझ्या पतंगाला ढील देऊन …
कारण मला तेच पतंग जातातच होता..
थँक्स माझ्या लंडनच्या मित्रा…..
तू होतास म्हणून हे शक्य झाले रे …..?
सतीश चाफेकर
Leave a Reply