या वर्षी भाऊबीजेला माझ्या बहिणींनी पतंजली च्या विविध साबणांचे एक कीट मला भेट दिले होते. मी ते साबण वापरतोय. मी जगभरातले साबण वापरले आहेत परंतु पतंजली चे साबण मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप आवडले आहेत. मुलतानी मातीचा साबण तर अप्रतिम.
हे साबण भारतीय आहेत. परंतु ते फक्त भारतीय आहेत म्हणून नव्हे तर त्यांचा दर्जा जगातील अतिशय उत्तम आहे. फक्त भारत नव्हे तर जगभर पतंजलीचे उत्पादने लोकप्रिय होतील. आधी वापरताना भीती वाटत होती पण आता इतर विदेशी कंपन्यांचे साबण कपाटात पडून आहेत.
मी काही पतंजली ची जाहिरात करीत नाही पण मला जे योग्य वाटते ते सर्वांना सांगायला काय हरकत आहे. अनुभव घेवून मगच निर्णय घ्या.
साबणाचा अनुभव घेतल्यावर सुनेनी पतंजलीचे बिस्किटे काल आणली आहेत. अजून चव घेतली नाही. त्याबद्दल नंतर सांगेन.
भारतीय जे जे चांगले आहे ते लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे. बाहेरच्या देशात जेव्हा भारतीय उत्पादने दिसतात तेव्हा मनस्वी आनंद होतो.
चिंतामणी कारखानीस —
29 December 2015
Leave a Reply