नवीन लेखन...

पाटोदा ….. एक आगळेवेगळे आदर्श गाव

औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे.

केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .

गावाचे आगळेवेगळे उपक्रम

१) गावात एकच पिठाची गिरणी आहे. जे ग्रामपंचायतचा कर १००% भरतात त्यांना वर्षभर दळण मोफत दळून मिळते.

२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.
ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.

३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रॅक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो. त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.

४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.

५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.

६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.

७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वयीत आहे.

८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.

९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.

१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.

११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.

१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.

१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके आहेत.

१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.

१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.

१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवण देतो.

१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.

१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.

१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही.

२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.

२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.

२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.

२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.

२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .

२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .

२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत.

२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहे.

असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..

7 Comments on पाटोदा ….. एक आगळेवेगळे आदर्श गाव

  1. Good afternoon I Mr Sanchit Jagannath Wagh from Sinhgad College Of Nursing Pune 41. We want to visit to Your great ideal village for our study n visit purpose as our study subject is community health nursing. Can you plz tell us how to contact and how we can get chance to visit your great ideal village. Thank you waiting in anticipation ??

  2. *खुप छान सर आपल्या गावाविषयी माहिती मिळाल्यानंतर आपला आणि संपूर्ण गावकऱ्यांचा खुप अभिमान वाटला आपण सर्व संपूर्ण महाराष्ट्राची शान आहात….*
    *सर आपले खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा..!!!*
    *सर लवकरच आपल्याला भेटायची खूप इच्छा आहे…!!!*
    *आपला-युवा-शिवव्याख्याते बाळासाहेब काळे???*

  3. गावाचा चेहरामोहरा आणि शासनाच्या सर्व योजनांचा पुरेपूर लाभ जर समस्त ग्रामस्थांना मिळवून द्यायचा असेल तर गावामध्ये कोणताही राजकीय पक्ष नको !

    • बरोबर सर … गावचा विकास करायचा असेल तर खरच गावात एकही पक्ष असला नको….!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..