पाऊस चिंब चिंबलेला
मनांतरी , वाहते दुथडी
ओलेती भावशब्दगंगा
नाहू घालीते , अंतरंगा ।।१।।
मनसृष्टीचेच प्रतिबिंब
रुपडेच देखणे बिलोरी
हृदयी , बरसे वर्षाऋतू
प्रीतपूर , येतो अंतरंगा ।।२।।
हिरवळलेली वसुंधरा
झुळझुळतो पवन धुंद
स्पर्शतो मायाळू गारवा
सुखवी हळुवार अंतरंगा ।।३।।
निर्मळ साऱ्याच संवेदना
रुतलेल्या हळव्या खुणा
ओघळती अलवार नेत्री
ओंजळीत मुग्ध भावगंगा ।।४।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ८२.
२० – ६ – २०२१.
Leave a Reply