आला तोच सुगंध
ज्याचा आठ मास विसर पडतो,
आला तोच मातीच्या गंधाचा अत्तर
जीव वेडावून भान हरपतो,
आला तोच सोहळा
ज्याचा सृष्टीला परमानंद होतो,
भिजवून धरतीला आकंठ
चराचरातून निर्मळ करतो,
आला पाऊस तोच पुन्हा
जो दरसाली नित्यनेमाने येतो,
तरीही नेहमी नव्या जुन्या आठवणींचा
पूर पुन्हा वाहून आणतो,
आला शहारा तोच तेव्हाचा
डोळे अलगद मिटून घेतो,
तू नाहीस जवळी तरीही
तुझ्या मागोमाग हा पाऊस नेतो,
— वर्षा कदम.
Leave a Reply