बरस बरसता, पाऊस धारा
मन हे, श्रावण होऊनी जाते…
चिंब, चिंबल्या आठवणींची
शब्दगीता, अलवार प्रसवते…
ओंजळ भावरंगल्या शब्दांची
अंतरातुनी मनांगणी पाझरते…
ओला ओला हा श्रावण सुंदर
तनमनांतर सारे भिजूनी जाते…
अवीट आगळी ही श्रावणीगंगा
चराचरालाच या शांतवुनी जाते…
जणू प्रीतीचेच डोहाळे सृष्टीला
दशदिशांना तृप्तीचे भरते येते
रचना क्र. ५५
२३/६/२०२३
-वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
Leave a Reply