पिंडदानाला कावळाच का?
मृत्यूनंतर तर्पण, श्राद्ध आणि पिंडदान केलं जातं. पिंडदान प्रक्रियेत कावळा या पक्ष्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण मनुष्य आणि कावळा यामध्ये निसर्गत: भरपूर साम्य आहे. कावळ्याला अशुभ पक्षी जरी मानलं असलं तरी पिंडदानासारख्या कामाला त्याचं शुभ असण्याचं महत्त्व पटतं. मनुष्य आणि कावळा हे दोन्ही समरूप असल्यामुळे कावळा या पक्ष्यांचा पिंडाला स्पर्श होणे अनिवार्य मानलं आहे.
मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी मनुष्य आत्म्याला काही त्रास होऊ नये म्हणून कावळा पिंडाला शिवणं गरजेचं आहे. कावळा हा पक्षी देवता आणि मनुष्य प्राण्यामधला दुवा आहे. काहीवेळेस घराच्या छपरावर कावळा ओरडू लागला तर पाहुणे घरी येणारं असा संदेश तो आपला देत असल्याचे आपल्याला कळतं लोकांना कावळ्यांची भाषा थोडीफार कळते त्यामुळे मृत लोकाचं प्रतीक म्हणून कावळा हा पक्षी पिंडाला स्पर्श करतो. स्वत: माऊली ज्ञानेश्वर महाराज एके ठिकाणी कावळ्याशी संवाद साधताना म्हणतात.
। पैल तो गे काऊ कोकताहे। शकुन गे माये सांगताहे।
। उड उड रे काऊ। तुझे सोन्यानं मढवीन पाऊ।
। पाहूणे पंढरी राऊ। घरा कैयेती।
। उड उड रे काऊ। तुझे सोन्यानं मढवीन पाऊ।
। पाहूणे पंढरी राऊ। घरा कैयेती।
वरील अभंगात माऊली कावळ्याला विचारत आहेत की, अरे पैलतीरावर बसून तो ओरडत आहेस. हा जणू माझ्यासाठी शुभशकुनच आहे. मला माहीत आहे की, पंढरीचा राजा माझ्याकडे पाहुणा म्हणून येणार आहे. हेच तू जीवाच्या आकांताने मला सांगतो आहेस. जर पंढरीराज माझ्या घरी आले तर तुझ्या पायाला सोनं लावीन आणि तुला नानाविध भोजन घालीन अशाप्रकारे हा मनुष्य आणि पक्ष्यामधला संवाद माऊलीनी रेखाटला आहे.
मनुष्य मृत झाल्यानंतर मोक्षासाठी धडपडत असतो आणि हाच मोक्षाचा आणि स्वर्गाचा दरवाजा या आत्म्यासाठी खुला करून देण्यासाठी कावळा मदत करतो. मृत्यूनंतर आत्मा कशाचंही भक्षण करू शकत नाही त्यामुळे त्या मनुष्य प्राण्याचं प्रतीक मानून हा पिंडदान विधी केला जातो आणि यामुळे मृत आत्म्यास गती मिळते.
हिंदू धर्म संस्कृतीअनुसार मनुष्याच्या मृत्यूनंतर पुढील तेरा दिवस अन्नासाठी चूल पेटवली जात नाही. यामुळेच कावळ्याला तांदळाच्या पिठाचा दुधात भिजवलेला गोळा पिंड म्हणून भरवला जातो. खरं तर या दिवसात चूल पेटवायची नसल्यामुळे रात्री तांदूळ दुधात भिजवून गव्हाच्या पिठात कालवून त्याचा गोळा केला जातो आणि याच गोळ्याला पिंड मानलं जातं. मृत्यूनंतर घरात शांती राहावी याकरता चूल पेटवली जात नाही आणि त्यामुळेच हा तांदळाच्या पिठाचा गोळा पिंड म्हणून कावळ्याला अर्पण केला जातो.
Leave a Reply