कवी एकनाथ पांडुरंग रेंदाळकर जन्म १ जुलै १८८७ रोजी झाला.
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर यांचे शिक्षण रेंदाळ आणि कागल येथे त्या काळातील इंग्रजी चौथीपर्यंत झाले. त्यांनी सांगली येथील पाठशाळेत काव्यव्युत्पत्तीचा अभ्यास केला; कोल्हापूरात बाळशास्त्री हुपरीकर ह्यांच्याकडे सिध्दांत कौमुदीचे अध्यपन केले. धर्म-विचार, मासिक मनोरंजन, करमणूक ह्या नियतकालिकांतून त्यांनी संपादकीय पदांवर काम केले. हिंगणे येथे ते काही काळ शिक्षक म्हणून कार्यरत होते. आपल्या आपल्या आरंभीच्या कविता रेंदाळकरांनी ‘मंदार’ ह्या टोपण नावाने लिहिल्या. एकनाथ रेंदाळकरांनी स्वतःला नेहमी स्वताला केशवसुतांचे निष्ठांवत अनुयायी मानले. संस्कृतप्रचुर, प्रौढ, प्रसादपूर्ण आणि सहज अशी त्यांची काव्यरचना आहे. तथापि ह्या काव्यरचनेपैकी फारच थोडी वैशिष्ट्यपूर्ण म्हणता येईल. अशरीर प्रेमाचा आपल्या काव्यातून त्यांनी पुरस्कार केला आणि हे त्यांचे आशयदृष्ट्या वैशिष्ट्ये होते. रचनेच्या दृष्टीने विचार करता, संस्कृतप्रमाणे मराठी कविताही निर्यमक लिहिण्याचा जोरदार, सक्रिय पुरस्कार त्यांनी केला. त्यामुळे निर्यमक कवितेविषयी बराच वादही निर्माण झाला. होता. एकनाथ रेंदाळकरांनी आंग्ल कवी टेनिसनच्या ‘एनॉक आर्डन’ काव्याने ‘सारजा’ ह्या नावाने रूपांतर केले. इंग्रजीबरोबर काही संस्कृत, बंगाली, गुजराती काव्यरचनाही त्यांनी मराठीत आणल्या.
एकनाथ रेंदाळकर यांचे २२ नोव्हेंबर १९२० रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे एकनाथ रेंदाळकर यांना आदरांजली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply