सारेच आहे प्रभूमय,
अणूपासून ब्रह्मांड होय…१,
ब्रह्मांड भाग तो ईश्वराचा,
आकाश भाग हा ब्रह्मांडाचा….२,
सर्वत्र व्यापले आकाश,
न जाणती त्याचे पाश, ….३,
वायूचा होवून संचार,
जीव जंतू जगविणार….४
वायू असे शक्तीचे रूप,
पेटवी तो प्राणदिप….५,
प्राण आपल्या अंतरी,
तोच असे रूप ईश्वरी….६
जसे शिव आणि शक्ती,
तसे प्राण व वायू असती…७,
बाहेरची वायू शक्ती,
अंतरिच्या प्राणास भेटती….८,
जाता दोन्ही एक होवूनी,
चेतना मिळते जीवनी…९
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply