नवीन लेखन...

 प्रभूची खंत

मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी

झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।

 

शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,

लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना  ।।२।।

 

तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी,

माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी  ।।३।।

 

आई – बापाच्या सेवेत,  गुंगलास तूं सतत,

सेवा शक्ति मला छळे,  तुला कांहीं न कळे,  ।।३।।

 

थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,

तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो  ।।४।।

 

उभा केलेस मजला    तू टाकलेल्या विटेवरी,

मग्न आई-बाप सेवेत,   निघूनी गेला दूरी      ।।५।।

 

होऊनी गेली,  अठ्ठावीस युगे,

आज देखील,  मी वाट बघे  ।।६।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..