क्रियेला प्रतिक्रिया,
ध्वनीला प्रतिध्वनी ।
तत्व ते सनातन,
दिसे नित्य जीवनी ।।१।।
फेकतां जोराने,
आदळे भिंतीवरी ।
प्रवास परतीचा,
होई तुमचे उरीं ।।२।।
शिवी वा अपशब्द,
दिले कुणासाठी ।
येऊनी धडकतील,
तुमचेच पाठीं ।।३।।
प्रेमाने बोलणे,
सुंगध आणिते ।
आनंदी लहरी,
मनां सुखावते ।।४।।
— डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply