नवीन लेखन...

प्रेम करावे कणाकणाने

प्रेम करावे मनामनाने, प्रेम करावे क्षणाक्षणाने
नसावे ओझे दडपणाने, प्रेम करावे कणाकणाने

प्रेम नसावे प्रभावळीचे घनघोर वा वर्षावाचे
घुसमटवणारे, गुदमरवणारे बिचकून टाकत दिपवण्याचे
प्रेम फुलावे प्राजक्तकळ्यांनी सतत सुगंधित या क्षणांनी
प्रेम करावे करांगुलीने, निर्व्याज्य अशा निखळतेने

प्रेम ना व्हावे शिकवणुकीने, शिस्तीने – जबरदस्तीने
प्रेम वहावे अंतउर्मीने, कळकळ आतुर आपुलकीने
प्रेम नाही सोपस्कार, उरकून कोरडा उपचार
प्रेम नाहीच उपकार, उपहार, तोलमोलाचा व्यवहार

प्रेम नव्हे केवळ बाह्यखुणा, भाबडा प्रांजळ चांगुलपणा
प्रेम आहे समर्पित गुंतणूका, जीवापाडच्या जपणूका
नाहीच विषय तडजोडीचा, तुझ्यामाझ्यातील देवघेवीचा
भाव असे हा जिव्हाळ्याचा, जागृतशा जाणीवांचा

प्रेम करावे समरसतेने, भान हरपित तन्मयतेने
मनामनांच्या तादात्म्याने एकरुप ध्यान, एकतानतेने
तरलतेने, तत्परतेने, नि अनिवार्य अशा अनिवारतेने
ओढीने, जोडीने झोकून देऊन उत्कट अशा उत्कंठतेने

प्रेमाचा हर एक क्षण व्हावा आकंठ ओथंबलेला
आसक्त, अनुरक्त, नि ओतप्रोत चिंब भिजलेला
छोट्या छोट्या दवबिंदूंना मग येई अमृताचा अर्थ
इवल्याशा करंगळीला जो देई गोवर्धन सामर्थ्य

प्रेमाचे क्षण हे वेचक, जोडा, जागवा जोजवा
लागणार का मग, प्रेमापायी ‘वणवण’ वा जोगवा

(हल्ली प्रेमाचे संदर्भ सुटत चालले आहेत. माणसांना बांधून ठेवणारे हृदयाचे रज्जातंतू तुटत चालले आहेत. प्रेमाऐवजी सोपस्कार, उपचार, शिष्टाचारच जास्त दिसतात किंवा एकमेकांशी चांगुलपणा म्हणजे प्रेम अशी कदाचित भाबडी समजूत आहे. प्रेमापायी ‘इन्व्हॉलमेंट’, समर्पण, ओढ, आपणहून काही करणं या ऐतिहासिक गोष्टी झाल्या आहेत.)

–यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(३/१/२०००)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..