निशब्द झाली होतीस तू मीही निशब्द झालो होतो
नदी किनारी आपण दोघे एकमेकांत गुंतलो होतो
प्रेम म्हणजे काय असते दोघांनाही माहित नव्हते
प्रथम दर्शनी मन दोघांचे घायाळ मात्र झाले होते |
जे मनात तेच ओठात पटकन रिते केलेस तू मन
मी मात्र तुजसवे बोलण्यास शब्दात अडकत होतो
जितक्या वेगाने आलीस तितक्याच वेगाने दूर गेलीस
मी मात्र आठवणी जागवत कविता रोज करीत होतो |
अजूनही रोज त्या नदी किनारी मी जाऊन बसत असतो
वाटतं परत कधीतरी येशील या आशेवर जगत असतो
नदी तर ती कधीच आटली आहे ना तिथं पाणी आहे
नुसतंच वैराण वाळवंट पण डोळ्यात प्रेमाचा झरा आहे |
— सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा
१ जून २०१९