मनिषाच्या आठवणीत तो लिहू लागला. मनिषाचं स्वप्न त्याने आपल्या हृदयात साठवलं आणि सुरु झाला त्याचा प्रवास एक प्रसिद्ध लेखक होण्याच्या दिशेने…आज त्याला प्रसिद्ध लेखक झालेलं पाहून कदाचित मनिषाही जिथे कोठे असेल तेथून पाहून नक्कीच खुश होत असेल…पण मला त्याची प्रसिद्धी नकोय मला हवाय त्याच्या चेहऱ्यावरील हरवलेला आनंद! हे बोलतानाअजयचेही डोळे ओले झाले आणि प्रतिभाच्या डोळ्यातुन तर अश्रू टपटप गळू लागले. पण तिचे अश्रू रमेशच्या बाबतीत तिलाच एक आश्वासक आश्वासन देत होते. आपले ओले डोळे पुसत प्रतिभा हळूच अजयच्या कुशीत विसावली…
एके दिवशी प्रतिभा विजयच्या खोलीची साफसफाई करीत असताना तिला विजयला कविता नावाच्या कोणा मुलीने लिहिलेली प्रेमपत्रे सापडली. ती पत्रे फारच जुनी होती कदाचित विषय शाळेत असतानाची असावीत. ती पत्रे वाचताना प्रतिभाचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि तिचे अश्रू खाली जमिनीवर टपटप गळू लागले. ती स्वतःशीच म्हणाली, “विजय फार पूर्वीच कोणाच्यातरी प्रेमात पडला होता आणि मी उगाच त्याच्या प्रेमात वेडी झाले होते.” आणखी शोधाशोध केल्यावर प्रतिभाला कवितांचा विजय सोबतचा एक फोटोही सापडला त्या फोटोतील कविता एखाद्या परीसारखी दिसत होती. पाहताक्षणी कोणीही तिच्या प्रेमात पडावे इतकी सुंदर आणि मनमोहक!
प्रतिभा आपल्या डोळ्यातील अश्रू पुसून विजय आणि तिचा भूतकाळ आठवू लागली. एका क्षणाला प्रतिभा विजयच्या प्रेमात इतकी डुंबली होती की तिला सगळीकडे फक्त आणि फक्त विजयच दिसायचा. विजय नेहमी गावी प्रतिभेच्या शेजारच्या घरात राहणाऱ्या त्याच्या मावशीकडे जायचा तेंव्हाच प्रतिभा आणि त्याची ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीच रूपांतर मैत्रीत झालं आणि मैत्रीच्या झाडाला हमखास येणारं फळ म्हणजे प्रेम त्यांच्या मैत्रीच्या झाडाला ते लागलं पण ते फक्त प्रतिभालाच दिसत होतं. प्रतिभा विजयसोबत लग्न करण्याचे स्वप्न पहात होती पण विजयकडून तिच्या प्रेमाला अपेक्षित प्रतिसाद कधीच मिळत नव्हता. एक दिवस जेव्हा विजय आणि त्याच्या मावशीने मध्यस्थी करून प्रतिभाच्या आई वडिलांकडे अजय करीता प्रतिभाचा हात मागितला तेव्हा मात्र प्रतिभाची खात्री पटली की विजय तिला फक्त आपली एक चांगली मैत्रीण मानतो. विजयच आपल्यावर प्रेम नसलं तरी आपलं प्रेम आयुष्यभर आपल्या संपर्कात राहील म्हणून प्रतिभाने अजयसोबत लग्नाला होकार दिला होता.
प्रतिभा विजयची वहिनी होऊन त्याच्या घरात आली. अजयचे नवरा म्हणून तिच्यावर जीवापाड प्रेम होते पण प्रतिभा मात्र त्याच्यावर हातचं राखून प्रेम करीत होती. प्रतिभाने कधीच मनापासून स्वतःला अजयच्या स्वाधीन केले नव्हते. एक पत्नी म्हणून ती अजयला पूर्णपणे अमर्पित नव्हती. विजयने काय? कोणीच तिला कविताबद्दल काहीच सांगितले नव्हते. आता मात्र प्रतिभाच्या रागाचा पारा चढला होता. तिने कविताचे प्रेमपत्र आणि फोटो स्वतःकडे ठेऊन घेतले आणि संध्याकाळी विजय कामावरून येताच ते त्याच्या समोर आदळत ती म्हणाली, हे काय आहे? त्यावर विजय थोडासा ओशाळत म्हणाला, वहिनी, अगं! ही माझी मैत्रीण कविता, आमची लहानपणापासूनची मैत्री आहे म्हणजे आमच्यात प्रेम आहे. आमच्या प्रेमाबद्दल सर्वांनाच माहीत आहे मला वाटत होतं तुलाही माहीत असेल, अजयने सांगितलं असेल! पण तुझा राग बघता असं दिसतयं की तुला आजच समजलं! सॉरी!!! विजयने कान पकडताच प्रतिभा म्हणाली, “मग माझी माझ्या होणाऱ्या जाऊबाईंशी कधी ओळख करून देणार?” त्यावर विजय म्हणाला, “ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गावी गेली आहे आली की लगेच!”
प्रतिभा आणि विजय यांच्यातील कविताबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या इतक्यात दारावरची बेल वाजली आणि प्रतिभाने धावत जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजात एक नाटकातील नायक उभा होता प्रतिभाला त्याच नाव आठवत नव्हतं. ती मंत्रमुग्ध होऊन त्याच्याकडे पहात होती इतक्यात विजय बाहेर आला आणि त्याने त्याला घट्ट मिठी मारून आत घेतले. त्याने प्रतिभासोबत ओळख करून दिली, “हा माझा मावसभाऊ निलेश, माझ्या मावशीचा मुलगा अगं! आपल्या नीलमचा भाऊ!!” प्रतिभा निलेशला बसायला सांगून त्याच्यासाठी चहा – पाण्याची तयारी करायला गेली. चहा पिता – पिता विजय, प्रतिभा आणि निलेश यांच्यातील चर्चा रंगल्या. बोलता बोलता विजयने थट्टा म्हणून सहज विचारलं, “काय म्हणतंय तुमचं नवीन नाटक?” त्यावर निलेश हसून म्हणाला, “नाटक काय म्हणणार? जे काही म्हणायचं ते तुमच्यासारखे सुजाण मायबाप प्रेक्षकच म्हणतील.” सध्या कोणतं नाटक करताय यावर निलेश “प्रेमात कधी – कधी” म्हणताच विजय म्हणाला, “वहिनी तुला सांगतो याच नाटक कोणत्याही प्रकारातील असो त्याच्या नाटकाच्या नावात प्रेम हा शब्द असतोच, प्रत्येक नवीन नाटकाच्या वेळी त्या नाटकातील नवीन नायिकेच्या प्रेमात पडतो आणि नवीन नाटक सुरु झाल्यावर तिला विसरतो.” “काय हो भावोजी?” या प्रतिभाच्या अल्लड प्रश्नाला सावरत उत्तर देत निलेश म्हणाला, “तू काय या विजयचं ऐकतेस तो तर साक्षात मेनकेलाही कवितासमोर असताना कुरूप म्हणतो.” “म्हणजे तुम्ही कविताला कुरूप म्हणताय?” प्रतिभाने टोला हाणल्यावर निलेश म्हणाला, “तसं नाही शेवटी प्रत्येक सुंदर गोष्टी मागे एक कुरुपता लपलेली असतेच ती सर्वाना दिसत नाही इतकंच!” बरं! थट्टा पुरे हे घ्या तुमच्यासाठी माझ्या नवीन नाटकाचे पास! नक्की या!!” म्हणत निलेशने त्यांचा निरोप घेतला आणि तो जाताच प्रतिभा आपला मोर्चा विजयाकडे वळवत त्याला प्रश्न केला, “काय करते काय आपली ही कविता?” त्यावर सावरत विजय म्हणाला, “एका शाळेत संगणक शिक्षिका आहे.”
इतक्यात आई बाजारातून आल्यामुळे चर्चा अर्धवट राहिली. विजय उठून बाहेर निघून गेला आणि आई प्रतिभाला घेऊन स्वयंपाकघरात. प्रतिभाचा एक मोठा गैरसमज दूर झाला होता. तिच्याकडून नकळत झालेल्या चुकीची तिला जाणीव झाली होती. लग्न झाल्यापासून आपण कोठेतरी अजयवर अन्याय केला असे तिला नराहून सारखे वाटत होते. त्यारात्री प्रतिभाच्या खऱ्या अर्थाने स्वतःला अजयच्या स्वाधीन केलं. आता ती अजयची खरोखरची अर्धांगिनी झाली होती. तनाने आणि मनानेही. असेच काही दिवस गेल्यांनंतर प्रतिभाची मावस बहीण रमा तिला अचानक भेटायला आली. तिला असं अचानक आलेलं पाहून रमला खूप आंनद झाला.
— निलेश बामणे.
Leave a Reply