आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही – भाग सहा
औषध न लगे मजला आणि औषध नल गे मजला या धर्तीवर आणखी एक श्लेष आजच एका गटात वाचायला मिळाला.
औषधे किती हवी जवळी ?
औषधे ? कि, “ती” हवी जवळी ?
औषधांमधे ताकद आहे कि “तिच्यामधे” जास्ती ताकद आहे.
जर “ती” जवळ असेल तर,
जर तिने जवळ घेतले असेल तर ,
जर तिला जवळ धरले असेल तर,
औषधे कशाला हवीत ?
असं या प्रश्नकर्त्याला विचारायचे आहे.
ती माझे सर्वस्व!
ती माझी प्रेरणा !
ती माझी धारणा !
ती माझी शक्ती !
तीच माझी भक्ती !
शक्तीचीही शक्ती तीच तूही !
सतत असतेस अंतरी
न दिसशी दुसऱ्यास जरी
माझी कर्ती करविती
बोलवती धनी तीच तूही !
केवळ बाजूला बसूनी
सतत सूचना करूनी
घेते गाडी चालवूनी
दुसऱ्या करवी
कधी कोपशी
कधी उर्वशी
कधी फटकारीशी
कशी कवटाळीसी
अशी कशी तू ललना
सांभाळीशी माझ्या जीवना
माझा प्राण तू
माझा श्वास तू
माझा भास तू
अंतरीची आस तू
तू माझे जीवन
जीवन झाले पावन
पावन होण्या कारण
कारण माझे मन !
मनासी देसी कामना
आत्म्यासी चेतना
शरीरासी वासना
तूची देसी
जन्मलो तुझ्यासाठी
जगेन तुझ्यासाठी
सोडलीस जर साथ तू
मृत्युही उभा दारी
सोडू नको साथ अशी
दुधावरची साय जशी
मुलाला माय तशी
रहा जवळी माझेपाशी
खरंय हे ?
एवढी ताकद आहे “तिच्यामधे” ?
का शंका का यावी मनामधे ?
एवढी जपावी ह्रदयामधे ?
अशी कोण लागोन गेली ?
“ती” म्हणजे कोण हे ज्याच्या त्याच्या विचार करण्यावर अवलंबून आहे.
मला “ती” म्हणजे “प्रतिकारशक्ती” वाटली.
आणि आपल्याला. ?
वाचा पुनः
– वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
02362-223423.
24.04.2017
आजची आरोग्यटीप
Leave a Reply