नवीन लेखन...

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अडतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग तीन

काही वेळा काही विषय परत परत येणार आहेत. कारण त्याविषयाचे गांभीर्यच तसे आहे.

विश्रांती घेताना आपल्या शरीरातील उर्जेवर आतली महत्त्वाची कामे शरीर पूर्ण करून घेत असते. बाहेरचे दार बंद केले तरच बॅकेला आतील कामे उरकता येतात. नाहीतर आव जाव सुरू असेल तर नीट लक्ष देऊन आतली कामे करता येत नाहीत. आणि सारखं आत बाहेर आत बाहेर करावं लागलं की, उगाच शक्ती फुकट जाते.
एखादी मातेला जर काही महत्त्वाची कामे करायची असतील तर बाळाला कसं ती जरा लवकर झोपवते. बाळ झोपले की कसं छान मन लावून काम करता येतं तसं !

फक्त ग्रीष्म ऋतुमधेच दुपारी झोप सांगितलेली आहे. अन्य ऋतुमधे दुपारी झोप निषिध्द आहे. असे का ?

ग्रीष्म ऋतुमधे निसर्गतः शरीरशक्ती कमी असते. सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर येतात. वातावरणात प्रचंड उष्णता असते. अशा उष्ण वातावरणात जर बाहेर राहून काम केले तर शरीरातील स्निग्धत्व कमी होईल, रूक्षत्व वाढेल. तेज महाभूताचूया ऊष्णतेमुळे शरीरातील जलमहाभूताचे प्रमाण, स्निग्धत्व, गरजेपेक्षा कमी होईल. असे होऊ नये म्हणून दुपारच्या वेळी घरीच सावलीत विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे.

जेव्हा आपण झोपतो, तेव्हा सर्व अवयव आपल्या कामातून निवृत्त होतात. काम कमी होते. श्रम कमी होतात. घाम कमी येतो. उर्जा वाचते. शक्यी वाचते. ही उर्जेची बचत ही ग्रीष्मात उर्जा मिळवण्यासारखेच आहे. पैसे मिळवण्याबरोबरच पैसे वाचवणे ही पण एक मोठी बचत आहे तसे !

ग्रीष्म ऋतुमधे ही उर्जा बचत करण्यासाठी विश्रांती सांगितली आहे. केवळ ग्रीष्म ऋतुमधेच ताकद कमी असते म्हणून या ऋतुमधे जशी दुपारी विश्रांती घ्यायची असते, तशीच विश्रांती ज्यांची ताकद कमी आहे अशा, बाल, वृद्ध, गर्भवती आणि आजारी माणसांनी देखील घ्यावी.

जागे असताना काही ना काही तरी काम सुरू असते. जेव्हा काम सुरू असते, तेव्हा श्वासगती देखील जास्ती असते. त्यामधे देखील उर्जा संपत असते. आजारी पडल्यावर विश्रांती यासाठीच सांगितली जाते, की ज्यामुळे उर्जेची बचत व्हावी. आणि ही उर्जा अन्य महत्त्वाच्या अवयवांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी वापरता यावी.

मोबाईलची बॅटरी संपत आली की, आपण कसे मोबाईल कमीत कमी हाताळतो, व्हिडिओ पहाणे बंद, ऑडीयो ऐकणे बंद, डाटा कनेक्शन ऑफ, वायफाय बंद. ब्राईटनेस लो, अननोन नंबरचे काॅल कट करणे, तरच असलेल्या दोन चार टक्के बॅटरी साठ्यावर अत्यंत महत्त्वाचे काॅल करण्यासाठी मोबाईल “स्लीप” मोडला टाकतो, म्हणजेच बॅटरी शिल्लक ठेवतो.

हं आता कळले. आमच्या भाषेत आम्हाला समजावनू सांगितले की पटकन कळते, ती पंचमहाभूते वगैरे डोक्यावरून जाणारे विषय !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.05.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..