आशुतोष गोवारीकर यांनी उमेदवारीच्या काळात सी.आय.डी.मालिकेतून शिवाजी साटम यांच्या साहाय्यकाचे काम केले. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९६४ रोजी झाला. अमोल पालेकरच्या ‘कच्ची धूप’ या मालिकेतून आशुतोष अभिनेता म्हणून लोकांना प्रथम दिसले. पुढे तो ‘होली’, ‘गूँज’, ‘कभी हां कभी ना’, ‘सलीम लंगडे पे मत रो’ सारख्या सिनेमांत काम केले. पण त्यांना अभिनय-कारकिर्दीत घट्ट मुळे रोवता आली नाहीत. मग दिग्दर्शन क्षेत्रातले पदार्पण असलेला त्यांचा ‘पहला नशा’ हा त्याचा चित्रपट दणकून आपटला. त्याच्या, आमीर खान नायक असलेल्या ‘बाजी’च्या दिग्दर्शनानेही बाजी मारली नाही. त्यामुळे ‘लगान’ हा त्याचा जीवन-मरणाचा प्रश्न बनला होता. आणि ‘लगान’ ने त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली. ते दिग्दर्शक व अभिनेता म्हणून अनेक आव्हानांना खंबीरपणे सामोरा गेले. आशुतोष गोवारीकर यांनी २००१ मध्ये ‘लगान’ तयार केला. त्यानंतर भारतात क्रीडाविषयक चित्रपटांची लाट आली. आशुतोष गोवारीकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी अभिनय, दिग्दर्शन व निर्मिती केली आहे. १९९८ सालच्या सरकारनामा ह्या मराठी चित्रपटामध्ये त्याने भूमिका केली होती. बॉलिवूडमधील दिग्दर्शनासाठी त्याला आजवर फिल्मफेअर सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २००१ मध्ये लगानला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट व २००८ मध्ये जोधा अकबर या चित्रपटाला फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार व फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार मिळाला.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply