तुझ्या आठवणींची ठिणगी पडते
अन, बेचिराख होतं भोवतालचं जग
उरतो आपण दोघंच फक्त
तू आणि मी ————————ll १ ll
अनंताच्या प्रवासाने थकलेला तू
अन, मी अज्ञातांच्या जगात भांबावलेली
ताटातुटीचं भय पांघरून
तू आणि मी ————————ll २ ll
तू अबोल, मुका, की असहाय्य?
अन, तुझ्या भेटीने सुखावलेली मी
आता विसाव्याच्या कवेत
तू आणि मी ————————-ll ३ ll
प्रेमात भिजलेली तुझी नजर
अन, माझ्या डोळ्यांचं तळंही तुडुंब
चिरंतन शाश्वत सुखात
तू आणि मी ——–आपण दोघे….ll ४ ll
…….. मी मानसी
टीप : मी काया आणि तू आत्मा असं समजून वाचावं … म्हणजे वेगळा अर्थ समजेल.
Leave a Reply