पुनर्नवाचे रोप पावसाळयात सर्वत्र रान कसे उगवते.घरगुती उपचारात पुर्वीच्या काळी ह्याचा बराच वापर केला जायचा.हि वनस्पती आजी बाईच्या बटव्यातील आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
ह्याचे बहुवर्षायू प्रसरणशील क्षुप असते किंवा वेल असते.पाने २.५-४ सेंमी लांब व गोल किंवा अंडाकार असतात ती मांसल व मृदू व रोम युक्त असतात.मागच्या बाजूस हे पान पांढरे असते.फुले लहान पांढरी किंवा गुलाबी असतात.मुळ मोठे बळकट,पांढरे व वाळल्यावर त्याला पीळ पडतो.
ह्याचे उपयुक्तांग बी,पाने व पंचांग अाहे.
आता आपण हिचे गुणधर्म पाहूयात:
पांढरी पुनर्नवा चवीला तिखट,गोड,कडू,तुरट असते.हि उष्ण असून हल्की व रूक्ष असते.
तांबडी पुनर्नवा चवीला कडू व थंड गुणाची व हल्की असते.
पांढरी पुनर्नवा त्रिदोषशामक असून लाल पुनर्नवा वात वाढविणारी व पित्तशामक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जखमेवर पुनर्नवाचा लेप लावतात.
२)सुज आली असता पुनर्नवाच्या पानाने शेकतात.
३)हि लघ्वी साफ व्हायला मदत करते त्यामुळे शरीरातील क्लेद बाहेर टाकला जातो.
४)पुनर्नवा शरीरातील सर्व धातूंचे पोषण करून रसायन कार्य करते.
५)शरीरात रक्त कमी असल्यास पुनर्नवा यकृताचे कार्य सुधारून रक्त वाढिला सहाय्य करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply