एक खवैया व त्यात खाउपीऊ घालण्यात आनंद लुटणारा या माझ्या पिढीजात स्टेटसमुळे मी राहतो तिथल्या म्हणजेच पुण्याच्या खाद्यसंस्कृतिशी एकरूप झालोय. डोक्यातली वळवळ आणि पोटातली कावकाव यांच्या संगनमताने कित्येक खाद्य चढायांवर मी जीव निछावर केलाय. पुण्यात आज शुक्रवार संध्याकाळ आहे अशी वदंता पसरायचाच अवकाश, बर्याचशा घरी गँसची शेगडी व मँडम यांची द्रुष्टाद्ष्ट चहा कॉफी पुरतीच होत असेल आणि त्या शुक्रवार संध्याकाळपासुन रविवारच्या रात्रीपर्यंत क्षुधाशांतीच्या विविध होमकुंडांभोवती पुणेकर खवैयांची भ्रमंती चालुच असते.
काळ व वेळेचे भान ठेवत ब्रेकफास्ट, ब्रंच, फुल जेवण, डब्बा पार्सल, उपवास आणि बिन उपासाचे, व्हेज नाँनव्हेज ड्राय स्नँक्स, आईस्क्रीम, मस्तानी अशा 30-40 रुपये ते 400-500 च्या रेंजमधे ही खादाडी चालते.
महाराष्ट्रियन जेवणावर कळपानी तुटुन पडायच असेल तर आपटे रोडवर चितळ्यांच श्रेयस म्हणजे टेरेसवरच्या थंड हवेत ब्रम्हानंद. तिथूनच पुढे डावीकडे आशा डियनींगच्या मउ लुसलुशीत पोळ्या तुम्हाला भुरळ घालतील; भात न घेतल्यास एक पोळी extra! लॉ कॉलेज रोडवरच्या कृष्णा डायनिंगच्या फुल जेवणात तुम्हाला छोटा कुरकुरीत कव्हरचा बटाटे वडा मिळाला किंवा त्याच तोडीचा बोट लागताच किंवा नजरानजर होताच लाजणारा ढोकळा मिळाला तर एव्हरेस्टवर पोहोचल्याचा आनंद मिळवाल. हे सगळे तुम्हाला डब्बा पार्सलही देतात. डब्बा तुमचा. नाहीतर GST व्यतिरिक्त Extra charge बसेल! डेक्कनवरच जनसेवाही तुम्हाला हीच सेवा देईल.
बटाटे वड्यासाठी जनसंमत ईतरही काही ठिकाण – प्रभा विश्रांती, बापट विश्रांती, बादशाही, गार्डन वडा पाव ही आहेत. दिनानाथ जवळ खिडकी वडा मेड टु अॉर्डर मिळेल. समोशासाठी ज्ञानप्रभोदिनीजवळ अनारसे.
मुंबई चौपाटीच्या शेकडो शाखा पुण्यात कार्यरत असुन व्हेज नाँनव्हेज चायनीज पंजाबी सर्व काही बसल्याजागी पुरवल जात. सेनापती बापट रोडच विद्यापीठाकडच टोक, कर्वे रोड मारुती मंदीर जवळ, खुद्द सारस बाग, लक्ष्मी रोड कुंटे चौक, ज्ञानप्रभोदिनी परिसर ह्या व अशा अनेक स्पाँटवर दाबेली व पावभाजीच्या विविध पील्लावळीचीही खैरात असते. कुठुनही कुठेही जाताना एखाद किलोमीटरसुध्दा पराठा हाऊस दिसत नाही अस होत नाही आणि केक आणि आईसक्रिमच्या दुकानांचा तर पुणेभर जणु सडाच घातलाय. तरुणाईसाठी मँकडी, पापा जोन्स, काँफी डे वगैरे जेबकत्र्यांनीही त्यांच जाळ विणलय.
पुण्यात रहायच असेल तर पुण्यात राहुन माशाशी वैर चालत नाही. कुठेही शाखा नसणार्या चितळे स्वीटचे एकट्या कोथरुड मधेच तीन फ्रँनचायझी आहेत. शिवाय देसाई अंबेवाले, बेडेकर आणि श्री मिसळ (सँपल, कट किंवा तर्री मारके) रामनाथ भजी, वैशाली, रुपाली यांच्याकडे काहीना काही नीमित्तानी तुम्हाला टोल भरावाच लागतो. कितीही वादळ आली तरी स्वीट होमनी शेवेसह इडली सांबार आणि मसाला दोसा यांची गिर्हाइक टिकवली आहेत. ते पण मस्ट व्हिजीट आहे.
संकष्टी, सोमवार, गुरुवार, शनिवार या सर्व वारी साबुदाणा खिचडी आणि साबुदाणा वडे यांची रेलचेल असते आणि सोबत काकडी बारीक किसुन दह्याला जीरा फोडणी दिलेली गोडसर कोशिंबीर. जेवणार्यानाही वाटलच पाहिजे उपास करावा. कर्वे रोडवर पाळंदे कुरीयर पाशी जोशी स्वीटस् त्यासाठी आख्या पुण्यात जगप्रसिध्द आहे. तांबड्या तिखटातली एकदम मोकळी आणि कमी तीखट.
जगात कुठेही जा, शिस्तबध्द आणि कामगारांचा कधीही संप न होणारे उडुपी रेस्टॉरंट असणारच. सकाळी 7 ते रात्री 11 ह्यांचा भटारखाना चालुच. इडलीपासुन सिझलरपर्यंत पर्यंत काहीही इथे मिळते. सिझलरची आँर्डर दिल्यावर वेटर तुमची मिठ मिरच्यानी दृष्ट काढायला येतोय हे विहंगम दृष्या डोळ्यात साठवतानाच आख्खा हाँटेल स्टाफ आपल्या अॉर्डरला स्टँडिंग ओव्हेशन देतोय असा फील येतो!
या सगळ्या जंजाळात पाणी पूरी, रगडापूरी, भेळ, पिझा, सँडविचेस यांनीही आपापले संसार व्यवस्थित थाटले असुन बहुतेकांच नाव गणेश असत. पाणिपूरी फँमिलि पँक आणि दोन भेळ पार्सल (तिखट सेपरेट) ही रविवार संध्याकाळची सर्वात पाँप्युलर अॉर्डर असते. इतरांपेक्षा दीडपट किंमतीची कल्याण भेळ फारच भारी! एकदम चाबुक!
मँरीएट, बारबेक्युनेशन आणि तत्सम बडी धेंड तसेच नाँन व्हेज पून्हा केंव्हातरी.
— प्रकाश तांबे
8600478883
Leave a Reply