अनेकदा आपण स्त्रीबद्दल वाचतो पण पुरुषाच दुख कधीच कोणाला समजत नाही. त्याचे दुख जरी कोणाला समजले तरी त्याच्याविषयी कोणीच बोलत नाही. अशीच प्रत्येक पुरुषाची व्यथा सांगणारी ही कविता.
स्त्रीचं ममत्व आणि प्रेम लोकांना कळतं
पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?
लहानपणी तो मोठी मोठी स्वप्न पाहतो
स्वतःच्या स्वप्नासाठी न जगता तो कुटुंबासाठीच जगतो
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मरमर करतो
पण बालवयातच ताईच्या शिक्षणासाठी
स्वतःच्या शिक्षणावर पाणी सोडतो
या बालवयातच त्याच्यावर जबाबदारीचं ओझं पडतं
पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?
तारुण्यात उसंत घ्यावी म्हणतो
तोवर कामाचा व्याप डोक्यावर चढतो
कुठे तरी चार पैशाची नोकरी मिळावी
म्हणून पुन्हा तो पायपीट करतो
काँलेजला रोज जातो पण अभ्यासात लक्ष देत नाय
कारण नोकरी शोध म्हणून रोज शिव्या देते आय…
या तारुण्यात पण त्याला तरुण म्हणून जगता येत नसतं
पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?
बायका-पोरांमध्ये आयुष्य सुखात घालवाव असं प्रत्येक पुरुषाला वाटतं
पण रोज सकाळी उठून संध्याकाळी झोपायला येणं एवढचं त्याचं रुटीन असतं
ट्रेन बस आणि आँफीस इतकेच त्याचे विश्व असते
चार प्रेमाचे शब्द बोलण्यासाठी त्याला मात्र फुरसत नसते
रोज धक्के खात जगतो तो, मात्र आपल्याला आईच सगळ्यात जवळ असते
त्याच्या भावना त्याला व्यक्त करता येत नाहीत
आई मात्र रडून मोकळी होते
पण रोज संसाराच्या विचाराने
त्याची मात्र घुसमट होते
संसाराचं ओझं काय असतं हे त्याच्याशिवाय कोणालाचं माहित नसतं
पण पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं?
बघता- बघता चिऊ- दादा इतके मोठे होतात
क्षणात विसरतात त्याला, अनं पोरकं करुन जातात
शेवटी चष्मा आणि काठी एवढेच सोबत राहतात
मग काही दिवसांनी चार खांदेकरीसुद्धा येतात
अलगद संसार सोडून तो सरणावरती चढतो
सगळ्यांना सुखात ठेऊन हा आयुष्यभर दुखाला कवटाळून बसतो
अपु-या त्याच्या स्वप्नाचं ते सरणंसुद्धा मग जळतं नसतं
पण कुटुंबासाठी जगलेल्या त्या पुरुषाचं दुखणं कुठे कोणाला समजतं ?
– अमोल उंबरकर
Leave a Reply