कट्यार काळजात घुसली’ हे नाटक मराठी रंगभूमीवर आणणारे नाटककार, दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर हे नाट्य वर्तुळात दारव्हेकर मास्तर या नावाने परिचीत होते.
त्यांचा जन्म १ जुन १९२६ रोजी झाला. अतिशय अभ्यासू,विचारवंत,आणि वक्तशीर असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. अनेक नाटकांना त्यांचे दिग्दर्शन लाभले होते. ते संगीत आयुष्यभर जगले आणि त्याची परिणति म्हणजे संगीत नाटक कट्यार काळजात घुसली. संगीत आणि कविता हा त्यांचा बालपणा पासूनचा गुण. तेजो निधी लोह गोल हे गीत त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी लिहीले होते. त्यांचा जन्म व शिक्षण नागपुरात बी.एस.सी,बी.टी.एम.ए, एल.एल.बी एवढे उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी नाट्यक्षेत्रात पाय रोवला. १९५१ मध्ये रंजन कला मंदिर या नावाने नाट्यसंस्था काढली, लहान मुलांचे साठीही त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली.
१९६१ साली त्यांनी दिल्ली येथे दूरदर्शनचे सहाय्यक संचालकपद सांभाळले, मा. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहीलेले व पं. जितेंद्र अभिषेकींच्या बहारदार संगीताने सजलेलं हे नाटक रंगभूमीवर आलं आणि त्याने एक नवा इतिहास रचला. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. मा.वि.वा शिरवाडकर यांनी तर नटसम्राट हे नाटक मास्तर दिग्दर्शित करणार असतील तरच मी देईन, असे म्हटले होते. मास्तरांनी आपल्या नाटकांना आपल्या अपत्यासारखे जपले.
व्यावसायिक रंगभूमीवर नटसम्राट खेरीज अश्रूंची झाली फुले, इथे ओशाळला मृत्यू, कट्यार काळजात घुसली आदी नाटकांचे यशस्वी प्रयोग त्यांनी केले. मा.पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे लेखन, डॉ. वसंतराव देशपांडे, फय्याज यांच्यासारखे अव्वल दर्जाचे गायक कलाकार आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत यामुळे ‘संगीत कट्यार काळजात घुसली’ हे नाटक गाजले, अजरामर झाले. त्या नाटकाने मराठी रंगभुमीवर इतिहास घडवला.
पुरुषोत्तम दारव्हेकर यांचे निधन २१ सप्टेंबर १९९९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या काही रचना
घेई छंद मकरंद
दिन गेले भजनाविण
जा उडुनी जा पाखरा
तेजोनिधी लोहगोल
दिन गेले भजनाविण सारे
मुरलीधर श्याम हे नंदलाल
या भवनातिल गीत पुराणे.
Leave a Reply