उड़त्या पाखरांना
परतीची तमा नसावी
नजरेत सदा नवी दिशा असावी
घरट्याचे काय आहे
बांधता येईल केंव्हाही
नजरेत सदा क्षितीज्यांच्याही
पलिकडे झेप घेण्याची
जिद्द असावी.
माणसांसारखीच दोन पायांवर चालणारी ही पाखरं त्यांच्या उडण्याच्या क्षमतेमूळे पक्षी म्हणून ओळखली जातात. पेंग्विन ,शहामृग यासारखी काही अपवाद वगळता बाकी सगळ्याच पक्षांना उड़ता येतचं. पिसांच्या व चोचीच्या रचनेमूळे पक्षी वजनाने अतिशय हलके असतात म्हणूनच ते उंच भरारी घेऊ शकतात. आणी हेच पिसे थंडी,गर्मीपासूनही संरक्षण करतात.
भारतीय संस्कृती मध्ये रामायण ,महाभारत यासारख्या काळांपासूनच पक्षांना खूप महत्व आहे. वेगवेगळ्या देवतांचे वाहन म्हणून पक्षांना महत्वाचे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे.
या सुंदर ,रंगीबेरंगी पक्षांच्या सुरेल आवाजाने सूर्य किरणांसोबत वसुंधरा जागी होते आणी प्रफूल्लित अशा दिवसाची सुरूवात होते. ही पाखरं निसर्गाशी खूप एकरूप असतात. निसर्गाच्या वातावरणातील बदलाची चाहूल सगळ्यात आधी यांनाच जाणवते म्हणून मग मेघराजाच्या आगमनापूर्वीच यांचे जंगलात,झाडावर घरटी तयार असतात. पण दृष्ट माणूस त्यांच्या साम्राराज्यावर अतिक्रमण करतोय …म्हणून मग तिही माणसांच्या घरात येऊन घरटी बांधू पहातायेत.
या पाखरांना माणसासारखं सीमारेषा हे बंधन माहीतीच नाही. ते थंडीच्या दिवसांमध्ये खूप दूर भटकत भटकत दूस-या देशातही जाऊन पोहचतात. यांना मायग्रेशन बर्ड़ किंवा प्रवासी पक्षी म्हणतात. भारतामध्ये बरेच पक्षी हिवाळ्यात मायग्रेशन करत येतात. पूण्याजवळ एका ठिकाणी यांना पहायला special tour arrange केले जातात.
कोकणातील गिरिच या गावाला पक्ष्यांचे नंदनवन म्हणतात. पहाटेलाच पक्ष्यांचा किलबिलाट सूर्य किरणांबरोबर सुरू होतो. इथे सर्व जातीची ,आगळ्या रंगाची ,अनोख्या ढंगाची अनेक पक्षी पहावयास मिळतात. काही न ऐकलेली नावे जसे की,रानभाई,जंगलभाई,जंगली सातबहिनी,केंकाट्या इत्यादी अनेक पाखरं बघावयास मिळतात.
या पाखरांमूळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो. बीजप्रसार होतो. निसर्गाची सुंदरता वाढते. सकाळी सकाळी पक्ष्यांचे सुमधूर आवाजाने आपण ताजे तवाने होतो. तसेच निसर्गातील कीड़ नियंत्रण आणी सरपटणा-या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम होते. इतका फायदा या पाखरांमूळे होतो.
पण येत्या काही वर्षात चिमणी सारखा पक्षी जो आपल्या अवतीभवती सतत दिसायचा तो आजकाल माणसानी लावलेल्या नवीन शोधांमूळे दिसेनासा झालाय. यासारखी अनेक पाखरं जी आपल्याला माहीती ही नाहीत. यांच्या जाती नष्ट झाल्या तरी समजलेही नसेल किंवा समजणार ही नाही. मग अशावेळी आपण मानव जातीने यांचे संवर्धन करणे खरचं खूप गरजेचे आहे. नाहीतर निसर्गाचा ड़ोलारा कोलमड़तोच आहे. तो संपायला वेळ ही नाही लागणार . पक्षीमित्र संमेलन या सारख्या संमेलनातून शक्य होईल तेवढे उपाय आणी योजना राबवल्या जाव्यात. आणी अधिक माहीती साठी विदर्भाचे पक्षीमित्र मारूती चित्तमपल्ली यांच्या पूस्तकांचे संदर्भ जरूर घ्यावेत. जसे की , पक्षीकोश, निळावंती, सूवर्णगरूड़, पाखरमाया इत्यादी त्यांची नावाजलेली पूस्तके आहेत. या व्यतिरिक्त भारतातील पक्षी निरीक्षकासाठी ड़ाॅ.सालीम अली यांनी “दि बुक ऑफ इंडियन बर्ड़” हे पुस्तक लिहीलेय.
चला तर मग लागू यात अभ्यासपूर्ण संवर्धनाला .
© वर्षा पतके -थोटे
24-01-2019
नागपूर
best article