नवीन लेखन...

 रेणूके जगदंबे आई

रेणुके जगदंबे आई    दर्शन दे मजला

तुझ्या मंदिरी आलो   पावन हो तू भक्तिला    ।।धृ।।

 

तुझे अजाण बालक    करितो खोड्या अनेक

न होई चित्त एक

तूंच समजोनी घेई    मम चंचल मनाला   ।।१।।

रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला

 

जमदग्नीची कांता    परशूरामाची तूं माता

मनीं तुजला भजतां

आशिर्वाद तूं देई     आनंदानें सर्वांला  ।।२।।

रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

 

गेले माझे जीवन    तुझे नाम घेऊन

कंठ आले दाटून

चुका आमच्या होई     क्षमा कर अज्ञानाला   ।।३।।

रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

 

सारे अर्पिले प्रेमांत    आळविले भक्तित,

परि न कळली रित

अत:करण गाणे गाई    आवाज नसे ओठाला    ।।४।।

रेणूके जगदंबे आई, दर्शन दे मजला

 

नको मजला धन    विटले आतां मन

सोडव मोहमायेतून

चरणांवरी लोळण घेई   हात पसरुं कुणाला   ।।५।।

रेणूके जगदंबे आई दर्शन दे मजला

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..