नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग १८

रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. रात्रभर खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेलतर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! बुटक्याच्या बॉडी बरोबर जर त्याचा मोबाईल हाती लागलातर, राघव कॉल हिस्ट्रीवरून रुद्रापर्यंत पोहचू शकत होता! काल स्पाय कॅमेऱ्या सोबत दोन लाखाची रोकड हि मिळाली होती! मुंबईत थांबणे धोकादायक होते. सारासार विचार करून रुद्राने रत्नागिरीचे तिकीट तत्काल मध्ये बुक केले होते.
ट्रेनला अजून बराच बराच अवकाश होता. म्हणून त्याने टीव्ही ऑन केला. स्क्रीनवर संतुकराव त्यांचे ‘इच्छापत्राचे’ जाहीर वाचन करत होते!
ती टीव्हीची ब्रेकिंग न्यूज पाहून रुद्रा चक्रावला. त्याने आपल्या सिगारेटच्या पाकिटातून नवीन किंग साईझ सिगारेट ओठाच्या डाव्या कोपऱ्यात अलगत धरून लाईटरने पेटवली. दोन दमदार कश मारल्यावर त्याचा मेंदू काहीसा तरतरीत झाला. काय माणसू साला! खुन्याला जायदाद बक्षिसे देणारा! संतुकराव सहदेव हॅट्स ऑफ टू युअर टॅलेन्ट! एक हाताने द्यायचे अन दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे! वा! मानला म्हाताऱ्याला. खून केल्याचे सिद्ध करून घ्यायचे, पण शिक्षा न होवूदेण्याची काळजी घ्यायची! तरच पंधराशे कोटीची लक्ष्मी पायघड्या घालणार! रुद्राला ती लक्ष्मी वाकुल्या दाखवतेय असे वाटले. साला कसलं सॉलिड चॅलेंज आहे!
रुद्राने घड्याळात पहिले. स्वतःशीच मान डोलावली. मोबाईल काढला आणि कॅब बोलावली. दहाव्या मिनिटाला कॅब दाराशी उभी राहिली. तो कॅबच्या मागच्या सीटवर बसला.
” डॉ. रेड्डीच्या क्लीनिकला घे!” राघवने ड्रॉयव्हरला सूचना केली.
डॉ. रेड्डीला भेटून आल्यानन्तर रुद्राचा खिसा बऱ्यापैकी ‘हलका ‘ झाला होता. पण ते गरजेचेच होते!
०००
दार उघडून आत आलेला तरुण भारदस्त होता. वय साधारण तिशीच्या आतबाहेर. म्हणजे आपल्याच वयाचा राघव त्याचे निरीक्षण करत होता.  उंची,सव्वा सहा फुट तर नक्कीच होती. भक्कम कमावलेले शरीर त्याच्या कपड्यातूनही जाणवत होते. ब्रँडेड निळ्या रंगाची जीन, वर पांढरा लेनिनचा फुल शर्ट,  शूज आणि बेल्ट काळ्या लेदरचे, चकचकीत पॉलिश्ड! डौलदार चाल,चालण्यात काठोकाठ भरलेला आत्मविश्वास! त्याचे प्रतिबिंब करारी चेहऱ्यावरहि उमटलेले होते! हि मॅन असच असतो नाही का? हा सिनेमा क्षेत्रात असता तर आजच्या सगळ्या ‘खानावळी’ बंद पडल्या असत्या! उगाच राघवच्या मनात येऊन गेले! त्याने एक छोटीशी ट्रॅव्हल बॅग डाव्या हातात अगदी सहज धरली होती. म्हणजे लेफ्टी असावा. त्याचे ओठ काळपट वाटत होते. चेन स्मोकर!
“मिस्टर राघव?” त्याने उंची डोओ लावला होता. त्याचा आवाज देहाला शोभेलसा म्हणजे जड आणि खर्जातला होता.
” एस!” प्रश्नार्थक मुद्रेने राघव म्हणाला.
“मी रुद्रप्रताप रानडे!” आपला दणकट पंजा पुढे करत तो म्हणाला. राघवने हात मिळवला. राघवला त्याच्या मसल पावरची कल्पना आली.
“प्लिज, बसा आणि  बोला काय काम होत !”
” मी सरेंडर करायला आलो आहे. माझ्या हातून प्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक संतुकराव सहदेव यांचा खून झाला आहे!”
राघव त्या देखण्या तरुणाकडे वेड्या सारखा पहातच राहिला!
— सुरेश कुलकर्णी 

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..