जन्म. ७ जून १९८१
अॅना कुर्निकोव्हाची गणना सर्वाधिक ग्लॅमरस खेळाडूंमध्ये होते. वयाच्या १५ व्या वर्षीपासूनच तिचे लाखो चाहते आहेत. एकही सिंगल्स किताब जिंकू न शकलेली अॅना तिच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत होती. अर्थात डबल्सची दोन ग्रँडस्लॅम तिच्या नावावर आहेत.
अॅना कुर्निकोव्हा ही १९९० आणि २००० च्या दशकातील सर्वाधिक चर्चित प्लेयर होती. तिने कधीच एखादे मोठे अॅनाने मार्टिना हिंगिससोबत दोन ग्रॅन्ड स्लॅम टायटल जिंकले होते. २००० मध्ये ती डबल्समध्ये पहिल्या स्थानावर होती. त्यामुळे ती टेनिसच्या जागतिक क्रमवारीत काही वर्षापूर्वी ८ नंबरवर पोहोचली होती.
अॅना कुर्निकोव्हाने पॉप स्टार एनरिकशी लग्न केले. या जोडीला जुळे अपत्य आहे. यापूर्वी अॅनाचे आईस हॉकी प्लेयर सर्जेई फेडेरोसोबत लग्न झाले होते, परंतु नंतर घटस्फोट घेतला. अनेक मासिकाच्या कव्हरसाठीही तिने फोटोशूट केलेले आहे. २००७ मध्ये टेनिस वर्ल्डचा निरोप घेतलेल्या अॅना कुर्निकोव्हाने एका अंडरगारमेंट्स कंपनीसाठी जाहिरात केली आहे.
आपल्या खेळासोबतच अॅना नेहमी स्टाइल आणि ग्लॅमरस इमेजमुळे जास्त चर्चेत राहत होती. एकेकाळी विम्बल्डन दरम्यान तिच्या ड्रेसमुळे भरपूर वादंग निर्माण झाले होते. विम्बल्डनला रॉयल टूर्नामेंट मानले जाते आणि यामुळे तिने परिधान केलेला ड्रेस मान्य नव्हता. तरीही आजही तिची गणना मोस्ट स्टाइलिश टेनिस प्लेयर्समध्ये केली जाते.
अॅना कुर्निकोव्हाचे टेनिस करिअर.
– ग्रँड स्लॅम : ऑस्ट्रेलियन ओपन (1999, 2002)
– टूर फाइनल्स (डबल्स) : 1999 आणि 2000
– सिंगल मध्ये 209 सामने खेळले आणि 129 जिंकले.
– डबल्स मध्ये 200 सामने खेळले आणि 71 जिंकले.
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply