साहित्य :
माप: १ कप = २५० मी. लि.
½ कप साबुदाणा – (जाड खिरे साठी ⅔ ते ¾ कप साबुदाणे)
२ कप दुध.
२ कप पाणी.
४ ते ५ चमचे ( टेबल स्पून) मध्यम जाड साखर.
४ ते ५ हिरव्या वेलचीचे दाणे
२ चमचे (टेबल स्पून) काजू तुकडे
१/२ चमचा (टेबल स्पून) किसमिस (raisin)
३ ते ४ केशर कांड्या (saffron strands)
कृती :
१. साबुदाणे साफ पाण्याने धुऊन घेणे जेणेकरून त्यांतील स्टार्च नष्ट / कमी होईल.
२. धुतलेले साबुदाणे जड तळ्याच्या भांड्यात १५ ते २० मिनिटे भिजत ठेवणे. ते भांडे वरून झाकण लाऊन बंद ठेवावे.
३. नंतर ते गॅसच्या शेगडीवर शिजवावे.
४. दरम्यान बाजूला दुध तापवून घ्यावे. गरम झालेले दुध साबुदाण्याच्या भांड्यात घालून ते ४ ते ५ मिनिटे शिजवावे.
६. साखर, वेलचीची पूड घालून मिश्रण चांगले २० ते २५ मिनिटे मंद गॅसवर गरम होऊ द्यावे.
७. थोड्या- थोड्या वेळाने मिश्रण ढवळत राहावे.
८. गॅस बंद करून काजू व किसमिस घालावी. केशर घालावा.
१०. थंड किंवा गरम, आपल्या आवडी प्रमाणे खिरीचा आस्वाद घ्यावा.
Leave a Reply