।। हेरंबाय नम: अश्वत्थपत्रं समर्पयामि ।।
पिंपळाचा मोठा वृक्ष असतो व त्याला वर्षायू पाने येतात.पाने गुळगुळीत ५-६ सिरा असलेली,लांब टोकदार अग्र असलेली,हृदयाकृती व लांब देठाचे असते.फळ लहान १ सेंमी व्यासाचे गोल असते ते पिकल्यावर लाल होते.
ह्याचे उपयुक्तांग आहेत त्वचा,फुले,पानाचे कोंब,डिंक.हे चवीला तुरट गोड,थंड गुणाचे व जड अाणी रूक्ष असते.पिंपळ हा कफ पित्त शामक आहे.
चला आता आपण त्याचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)रक्तशुध्दी करीता तसेच त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी पांनांच्या कोंबाचा लेप करतात.
२)जखम भरून येण्याकरीता पिंपळाच्या सालीचे चुर्ण लावतात.
३)रक्तस्रावावर पिंपळाचा चीक लावतात.
४)पिंपळाचे पिकलेले फळ मधासोबत सेवन केल्याने रक्तात वाढलेली उष्णता कमी होते.
५)ज्या स्रीला गर्भधारणेची होत नाही तिला पिंपळाच्या फळाचे चुर्ण दुधासह सेवन करायला दिले जाते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply