योजना तुमची चुकून जाते, जीवनाच्या टप्प्याची ।
अखेरचा क्षण जवळीं येतां, आठवण होते त्याची ।।
जोम असतां शरीरीं तुमच्या, करीता देहासाठीं ।
वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता, ईश चिंतना पोटीं ।।
गलित होऊनी गेली गात्रे, अशांत करी मनां ।
एकाग्रचित्त होईल कसे तें, मग प्रभू चरणां ।।
दवडू नका यौवन सारे, ऐहिक सुखामागें ।
त्या काळातील प्रचंड ऊर्जेस, लावा सत्कर्मे ।।
सदृढ असते शरीर जेव्हां, एकाग्र करा चित्त ।
मिळणाऱ्या ऊर्जेला, खर्च करा योग्य चिंतनांत ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply