सगळं काही थांबू शकतं
पण मन थांबत नाही,
किती आवरायचं म्हणलं
तरी मन सावरत नाही..
विसरायचं सार सहज म्हणलं
तरी मनाला कळतं नाही,
गुंतायचं नाही म्हणलं तरी
मनाच गुंतण सुटतं नाही..
कितीक समजावे बुद्धीने
परी मनापुढे बुद्धी चालतं नाही,
मोह अंतरीचे सोडायचे मोहक
तरी मनाला काही ते कळतं नाही..
द्वंद अनेक चालती अलगद अंतरी
परी मन ओढाळ वेल्हाळ होते,
सगळेच प्रयत्न फसतात मनासमोर
अन प्रश्न समोर उरतात निःशब्द अनेक..
मधुर मनाचे खेळ सारे मनस्वी
न मला आता काही कळते,
मी केव्हाच सोडले तुझ्यात प्रश्न
तुझे मन न अलवार कधी गुंतले..
फरक दोघांत हा मन खेळाचा
हरले मी अन हलकेच मन गुंतले,
मनाच्यापुढे न चाले कधी काही गणित
तुला न माझ्या मनीचे भाव अलवार कळले..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply