सागराला गळामिठी मारताना
नदीचा पाय क्षणभर मागे सरतो I
पर्वतशिखरापासून सुरु झालेला,
वाटेतल्या जंगलांना, खेड्यांना
वेढे घालत इथवर झालेला
प्रवास ती वळून बघते म्हणे –
आणि समोर दिसत असतो
अथांग रत्नाकर,
त्यांत सामावणे म्हणजे
स्वतःचे वेगळे अस्तित्व संपणे I
पण परतीचा मार्ग खुंटलेला
कोणीच परतू शकत नाही I
परतणे म्हणजे एकप्रकारे केलेला प्रवास नाकारणे I
सागरात प्रवेशाची जोखीम
प्रत्येक नदीला उचलावीच लागते
मनातील भीतीवर मात करत
त्याचवेळी नदीला साक्षात्कार होतो-
हे अस्तित्व त्यागणे नाहीच
उलट-
हे तर समुद्र होणे आहे !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply