॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
जनी सर्व सुखी असा कोण आहे ।
विचारे मना तूचि शोधूनी पाहे ।
मना तांची रे पूर्वसंचीत केले ।
तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥
मना मानसी दु:ख आणू नको रे ।
मना सर्वथा शोक चिंता नको रे ।
विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी ।
विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी ॥
मना संग पां रावणा काय झाले ।
अकस्मात ते राज्य सर्वै बुडाले ।
म्हणोनी कुडी वासना सांडी वेगी ।
बाले लागला काल हा पाठीलागी ॥
जीव कर्मयोगे जनी जन्म झाला ।
परी सेवटी काळमूखी निमाला ।
महा थोर ते मृत्युपंथेची गेले ।
कितीयेक ते जन्मले आणि मेले ॥
मना पाहता सत्य हे मृत्युभूमी ।
जिता बोलती सर्व हि जीव मी मी ।
चिरंजीव हे सर्व हि मानिताती ।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
Leave a Reply