समस्त पुरुष वर्गाला जाहिर सुचना..
दिवाळी निमित्त घरात फराळ झालेलाच असेल तयार तो खाताना पुढीलप्रमाणे काळजी घ्या
फराळाचे ताट समोर आल्यावर त्यातली चकली संपुर्ण उचलुन खा. त्याचे तुकडे करुन मोडुन ठेवुन खाउ नका.
चकली पाहिल्यावर चुकुनही आपल्या तोंडुन “ग्रीन चटणी आण” असा उच्चार करु नका.
चकली,चिवडा शेव खाताना सारखा शेजारचा पाण्याचा ग्लास उचलुन घोट घोट पाणी पिवु नये.
शेव आणि चकली पाहुन अजुन काय आहे कॉम्प्लिमेंटरी असं विचारायचा मोह टाळावा.
काहितरी वेगळं बनवायला पाहिजे दिवाळीत शेव चकलीपेक्षा, वर्षभर तेच खाउन कंटाळा येतो असं बोलुन घरच्यांच्या नजरा आपल्याकडं वळवुन घेवु नयेत.
शेव, चकली खाताना ‘फ्रिज मधील गार पाणी आणा’ असे फर्मान चुकूनही सोडु नये.
चकली पुन्हा हवी असल्यास *रिपीट* शब्द कदापी वापरु नये.
चिवडा अथवा फरसाण बरोबर बारीक चिरलेला कांदा खुप छान लागतो असे कधीही म्हणू नये.
अधिकच्या सुचना आपापल्या माहिती आणि अनुभवानुसार कमेंट मधे ॲड कराव्यात.
…… काळजीवाहु