संध्यासमय येताच पक्षी, घरट्याकडे सारे निघाले,
किती दूर, किती योजने,
लांबवरी फार उडाले,–||१||
किलबिलाट करत पिल्ले,
असतील वाट पाहत,
सय येता त्यांची एकदम,
पंखात जसे बळ शिरत,–||२||
आपुले घरटे नजरेस पडतां,
जीव भांड्यात कसा पडे,
पिल्ले सुरक्षित पाहता,
आनंदओसंडे चहूकडे,–!!||३||
धोका किती कोवळ्या जिवांना, सोडून जायचे निराधार,
नाग साप मांजरांचा ,
डोळाच असता त्यांच्यावर,-!!||४||
नित्य कामास जाणे,
पक्षीगणांना असते अटळ,
आपल्यावाचून कोण भरवे,
घास मायेने पिल्लांना, निव्वळ,!!||५||
संगोपन त्यांचे करणे,
कर्तव्यच आहे आमुचे ,
आमची छोटी छोटी रुपे,
प्रेमाची इवली प्रतीके,–!!||६||
हळूहळू शिकवायाचे त्यांना, विशाल गगना तोंड देणे,
निर्भय होऊन उडायचे,
ऊन — पावसात राहणे,–!!||७||
संकटे आली किती जरी,
शांत आणि स्थिरच राहणे, कर्तव्यपरायण राहून आपुले,
सारे जीवन व्यतीत करणे,–!!||८||
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply