जरी, मी नसलो मनकवडा
तरी मी सारे ओळखून आहे
समोरचे हास्य बेगडी नाटकी
मनभाव सारे ओळखून आहे
सत्य असत्य लोचनी तरळते
सद्भावनां! अंतरास सजविते
मन निर्मळ सुखानंदाचा झरा
सारेच मी शब्दात गुंफतो आहे
कां ? उगाच उणेदुणे उसवावे
जे छळते मनास, ते विसरावे
विवेके! सदा जगुनी जगवावे
एव्हढेच आपुल्या हाती आहे
मैत्र! लाभणे, भाग्य भाळीचे
निर्मळ! सुखाचेच प्रीतीप्रांगण
जीवाजीवा, सहजी बिलगावे
जीवनाची, हीच सांगता आहे
–वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
१४ – १ – २०२२.
Leave a Reply