|| हरी ॐ ||
आल्या आल्या श्रावण सरी,
अवचित करिती चिंब परी !
उन पावसाच्या खेळ हा,
सप्तरंगी पडदया आड हा !
रत्यांवर हिरव्या पानांचा सडा,
दिसतो जसा हिरवा सरडा !
सख्या निघाल्या खेळाया ह्या,
जमवून बाहुलीचे लग्न त्या !
रानीवनी मुक्त हिंडती !
लग्नासाठी जागा निवडती !
जंगलातील रस्ता निसरडा !
तरी नसे मना मुरडा !
बाहुला आला, सर्व लवाजमा सजला,
अंतरपाठ सप्तरंगी मिळाला !
लग्न लागताच श्रावण सर आली,
ऐतीच वाजंत्री वाजू लागली !
वार्यानेही साथ दिली,
वेणूनेही लाज राखली !
रंगीबेरंगी फुलांच्या माळा,
नवरा-नवरीच्या पडल्या गळा !
घरी जाया बाहुली निघाली बाहुल्या,
डोळ्यांच्या कडा पाणावल्या !
अवचित येता श्रावण सरी,
न दिसे डोळा पाणी परी !
जगदीश पटवर्धन, दादर (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply