जन्म हा सुखाचा की दुःखाचा..
कां ? कुठला अक्षम्य गुन्हा आहे..
जरी गतजन्मांचेच ऋणानुबंध सारे
कुणाची कुणाला आज ओढ आहे..
बेगडी नात्यांचेच स्वार्थी भावबंध
खरे कोण कुणासाठी जगतो आहे..
ऐश्वर्याचे रांजण ,जरी स्वर्गीयसुखी
सांगा , आज मनःशांती कुठे आहे..
ऐश्वर्यासाठी नात्यांचीही पायमल्ली
नि:स्पृह प्रेम जिव्हाळा संपला आहे..
बिलोरी प्रतिबिंबही कितीही देखणे
तरी इथे सत्य, असत्य संभ्रमात आहे..
वास्तव ! जे पेरावे तेच जगी उगवते
हे सत्य कुणा केंव्हा कळणार आहे..
कां ? जगण्याचीच हीच रित जगती
जन्म कलियुगी , जीवाला सजा आहे..
©️ वि.ग.सातपुते (भावकवी)
रचना क्र. ३८
दिनांक :- १३-३-२०२१
Leave a Reply