ज्येष्ठ तबला वादक सुभाष चंद्रकांत कामत यांचा जन्म २५ जून १९६१ रोजी झाला.
सुभाष कामत यांनी आपले वडील चंद्रकांत कामत यांच्याकडून तबल्याचे शिक्षण घेतले. चंद्रकांत कामत हे ज्येष्ठ तबला वादक होते. १९५६ पासून ते १९९१ अशी तब्बल पस्तीस वर्षे त्यांनी आकाशवाणीत तबलावादक म्हणून काम केले. आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक श्रेष्ठ कलाकारांबरोबरच नव्या कलाकारांनाही संगत करण्याचे काम त्यांनी केलेच; पण त्याचप्रमाणे कला जगतात मानाच्या असलेल्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवामध्ये त्यांनी १९५४ पासून साथसंगत करण्यास सुरूवात केली आणि प्रदीर्घ काळ ती सुरू होती.
त्यांच्या वयाच्या १० वर्षी ज्येष्ठ तबला वादक सामताप्रसाद यांनी त्यांचे कौतुक केले होते. पुढे त्यांनी तबला वादक सामताप्रसाद यांच्या कडे पणे तबल्याचे प्रशिक्षण घेतले.
सुभाष कामत हे आकाशवाणीचे कलाकार आहेत. सुभाष कामत यांनी आपल्या वडिलांच्या प्रमाणे अनेक संगीत महोत्सवामध्ये तबल्याची साथसंगत केली आहे.
सुभाष कामत यांनी अमेरिका,कॅनडा,जपान युएई येथे अनेक कलाकारांना साथ केली आहे. सुभाष कामत हे एकल तबला वादन उत्तम रीतीने सादर करतात.
सुभाष कामत यांना गंधर्व महाविद्यालयाकडून संगीत पुरस्कार मिळाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply