नवीन लेखन...

बॉलिवूडमधील ‘काश्मीर की कली’ शर्मिला टागोर

शर्मिला टागोर यांचे वडील गितेन्द्रनाथ टागोर एल्गिन मिल्स चे महाप्रबंधक होते. त्यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून हिंदी सिनेमात अभिनयाला सुरुवात केली. १९५९ सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटा पासून आपले फिल्मी करियरची सुरवात केली. शर्मिला टागोर बॉलिवूड मध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणूनसुध्दा त्यांना ओळखले जाते. १९६० मध्ये शर्मिला टागोर यांनी बिकनी घालून बॉलीवूड मध्ये हलचल उडवून दिली.

भारताला सर्वात प्रथम नोबेल पुरस्काार मिळवून देणा-या रवींद्रनाथ टागोर यांची नातेवाईक असलेली शर्मिला टागोर आणि मन्सू र अली खान पतोडी ही एक आदर्श जोडी म्हीणून गणली जाते. मन्सूीर अली खान पतोडी व शर्मिला टागोर यांची प्रेम कहाणी १९५९ पासून होती या दोघांनी १९६८ च्या डिसेंबर मध्ये लग्न केले. जेव्हा नवाब मन्सूर अली खाँ पतौडी यांनी आपल्या आई साजिदा सुल्तान यांच्याकडे शर्मिला टागोर यांच्यावर प्रेम असल्याची कबुली दिली व आपल्या आईकडे शर्मिला टागोर यांच्यासोबत लग्न करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र साजिदा सुल्तान या नात्यासाठी तयार नव्हत्या. कारण शर्मिला या बंगाली होत्या.

लग्नासाठी परवानगी मिळवण्यासाठी साजिदा यांनी नवाब पतौडी आणि शर्मिला यांच्यासमोर एक अट ठेवली. ती म्हणजे लग्नापूर्वी शर्मिला यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा. धर्मांतर करुनच त्या नवाब पतौडीसोबत लग्न करु शकतील, असे त्यांनी म्हटले. शर्मिला यांनी ही अट मान्य केली आणि लग्नापूर्वी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. यासाठी त्यांचे नाव बदलून आयशा सुल्तान असे ठेवण्यात आले. असे सांगितले जाते की १९६७ मध्ये मन्सूेर पतोडी यांची आई साजिदा सुल्तान शर्मिलाला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला टागोर यांचा बहुचर्चित ‘एन इव्हिनिंग इन पेरिस’ सिनेमा प्रदर्शित होणार होता. या शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती.

शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते. शर्मिला टागोर यांना नवीब पतोडी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स काढून टाकण्यास सांगितले होते. शर्मिला टागोर यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पटौदी यांची आई नाराज होऊ नये. १९६६ मध्ये फिल्मफेयर मॅगझिनच्या ऑगस्ट महिन्याच्या कव्हरवर शर्मिला टागोर बिकिनी परिधान करून झळकल्या होत्या. भारतीय प्रेक्षकांनी प्रथमच अभिनेत्रीला बिकिनीमध्ये पोज देताना पाहिल्याने एकच खळबळ माजली होती. वाद एवढा वाढला की, संसदेतही या मुद्द्यावरून रणक्रंदन झाले.

शर्मिला टागोर त्या काळातील पहिल्यात अशा अभिनेत्री होत्या, ज्यांनी एखाद्या मॅगझिनसाठी बिकिनी परिधान करून फोटोशूट केले होते. एवढेच नाही, तर फिल्मफेयर मॅगझिनसाठी बिकिनी पोज देणाऱ्या त्या पहिल्या अॅक्ट्रेस बनल्या. शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटाला फिल्मफेयर सर्वश्रेष्ट अभिनेत्री अवार्ड व मासूस या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार ने सम्मानित केले. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांची जोडीला बॉलिवुडची सफल जोडी मानले जाते. दोघांनी ६ सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले ते आराधना, सफर, अमर प्रेम, छोटी बहू, दाग और आविष्कार.

राजेश खन्ना यांच्यासोबत आराधना हा शर्मिला यांचा बहुचर्चित सिनेमा होता. बेशरम सिनेमात मा.अमिताभ सोबत काम केले होते. २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष होत्या. या पदावर कार्यरत असताना आजच्या काळात होणा-या अंगप्रदर्शनावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. आज शर्मिला टागोर चित्रपटापासून लांब असल्या तरी सामाजिक कार्या मध्ये त्यांचे खूप काम आहे.

संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..