समीर गांगुली दिग्दर्शित शर्मिली हा हिंदी चित्रपट २५ एप्रिल १९७१ रोजी प्रदर्शित झाला.
यात चित्रपटात राखी यांची दुहेरी भूमिका आहे. कॅ. अजित कपूर (शशी कपूर) लष्करी तळावरून परतत असताना एका पार्टीत त्याची कामिनीशी (राखी) ओळख होते. घरी परतल्यावर त्याचेपालनकर्ते जोजफ (नझीर हुसेन) त्याला लग्न करण्याचा आग्रह करून मुलगी दाखवायला नेतात. तिचे नाव कंचन(राखी). तिला पाहून अजित चांगलाच चक्रावतो कारण तो जिला भेटलेला असतो ती हीच तरुणी असते. तो लग्नाला संमती देतो. लग्नाची तयारी चालू असतानाच अजितला कळतं की जिला आपण भेटलो ती ही नव्हे तरतिची जुळी बहीण आहे.
कंचन दु:खी होते पण आपल्या बहिणीच्या सुखाचा विचार करते. कथा नंतर वेगळं वळण घेते.
गीतकार नीरज आणि संगीतकार एस. डी. बर्मन या सदाबहार गाणी देणाऱ्या जोडीची या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय लोकप्रिय झाली होती. आजही या चित्रपटाचं शीर्षक गीत ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाणं गाताना किशोरकुमारने आपल्या खास शैलीत गाऊन एकच धमाल उडवून दिली होती. यातील इतर गाणी ही तेवढीच गाजली होती.
किशोर कुमार, लता मंगेशकर, आशा भोसले या ताकदीच्या गायकांनी ही गाणी गायली होती. विशेषत: बिनाका गीतमाला या कार्यक्रमात ‘ओ मेरी शर्मिली’ हे गाण नंबर वन सरताज ठरलं होतं. १९७१ सालातील ‘बिनाका गीतमाला’च्या १०० गाण्यांमध्ये ‘शर्मिली’ चित्रपटातील गाण्यांचा तेव्हा समावेश करण्यात आला होता. ‘खिलते है ये गुल यहा’, ‘ओह मेरी शर्मिली’ ही गाणी आजही अनेकांच्या प्ले लिस्टचा भाग आहेत. या चित्रपटामध्ये शशी कपूर, नरेंद्र नाथ, नाझिर हुसैन, इफ्तेखार, एस एन बॅनर्जी, अनिता गुहा आणि अतिफ सेन यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशी कपूर आणि दुहेरी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीची समीक्षकांनी तर प्रशंसा केलीच होती पण व्यावसायिकदृष्ट्याही ते यशस्वी ठरले होते.
भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘शर्मिली’ चित्रपट हिट ठरला होता. ‘बॉक्स ऑफीस इंडिया’ या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार चित्रपटाने जवळपास २,६०,००,००० रुपये इतकी कमाई केली होती.
अनिल रा. तोरणे
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply