ह्याचा १७-२० मीटर उंच मोठा डेरेदार वृक्ष असतो.ह्याची पाने संयुक्त,गुळगुळीत व लोम युक्त असतात.पत्रके रूंद असतात व पत्रकांच्या ४-८ जोड्या असतात.फुले पिवळसर पांढरी सुगंधी व नाजूक असतात.फळ १५-३० सेंमी लांब व १.५-३ सेंमी रूंद चपट्या शेवगा असतात.बिया चपट्या,गोल,धुरकट असतात.हिवाळ्यात पाने गळतात.
ह्याची चव तुरट,कडू,गोड असून गुणाने उष्ण असते.ह्याचा प्रभाव विषनाशक आहे.तसेच हा हल्का,व तीक्ष्ण असतो.हा त्रिदोषघ्न अाहे.
चला आता आपण शिरीषाचे औषधी गुणधर्म जाणून घेऊयात:
१)सुज आलेल्या भागावर शिरीष बी चा लेप करावा.
२)दातांच्या रोगामध्ये शिरीषाचा सालीचा काढा गुळण्या करायला उपयुक्त आहे.
३)दम्याच्या रोगात शिरीष फुलांचा रस मध व पिंपळी चुर्ण घालून देतात.
४)ज्या बायकांच्या अंगावर पांढरे जाते त्यांना शिरीष सालीचे चुर्ण समभाग गाईच्या तुपामधून देतात.
५)शिरिष सालीचा काढा त्वचारोगामध्ये स्त्राव कमी करायला उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply