आपल्या रसाळ सुमधुर, भावपूर्ण वाणीने आयुष्यभर वांङमय निर्मिती करणारे विख्यात कवी श्रीधर स्वामींचा जन्म नाझरेकर कुळात १६५८ च्या सुमारास झाला.
पंढरपूर जवळ नाझरे हे त्यांचे गाव.. या गावाची पिढीजात वतनदारी त्यांच्या पूर्वजांना मिळाली होती.. नाजरे या गावातच प्राचीन ऋषिकुल परंपरेला साजेल असे त्यांचे शिक्षण झाले होते.. वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत, भागवत, व्याकरण, ज्योतिष हे ग्रंथ तसेच नामदेव, तुकाराम, एकनाथ या संतांच्या साहित्याचाही त्यांनी अभ्यास केला होता..
वडिलांसोबत पंढरपूरला आलेल्या श्रीधर स्वामींनी पुढे पंढरपूर हीच आपली कर्मभूमी समजली.. इथेच त्यांनी अध्यापनाचे काम सुरू करून अफाट ग्रंथनिर्मिती केली. सव्वा लाख ओवींचे साहित्य लिहिणाऱ्या श्रीधर स्वामींचा ग्रंथरचनेचा आरंभ ‘हरिविजय’ पासून सुरू होऊन सांगता ‘शिवलीलामृत’ने झाली.. यामध्ये ‘पंढरी महात्म्य’, ‘व्यंकटेश महात्मे’, ‘वेदांत सूर्य’ यावर संस्कृत स्तोत्रे, ‘रामविजय’, ‘पांडवप्रताप’ ही काव्यरचना.. पांडुरंग, रुक्मिणी राम, कृष्ण यांच्यावर अभंग तसेच आरती, स्तवने, पदे इत्यादी प्रकारची रचना केली..
तसं पाहिलं तर श्रीधरांचे घराणे आनंद संप्रदायाचे; परंतु संतांना आदर्श मानणाऱ्या श्रीधरांनी वारकरी संप्रदायाची जवळीक साधली आणि आपल्या मनातील भावना, विचार व्यक्त करण्यासाठी संतांची अभंग व ओवी ही अभिव्यक्तीची माध्यमे वापरले. त्यांचे ग्रंथ त्या काळात लोकमान्य झाले होतेच. पण आजही ती मनोभावे वाचली जातात..
७ डिसेंबर १७३० रोजी त्यांचे निधन झाले..
पांढरी माहात्म्य व पांडुरंग माहात्म्य अशी 2 पुस्तके किंवा पोथी हवी आहे।आपण देऊ शकाल का ?