नवीन लेखन...

शिवी; एक अत्यावश्यक मानसिक गरज..

आमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या ‘व्यवस्थे’ला दिलेल्या शिव्या असतात..
आम्ही लहान असताना नालायक, बेशरम, फाजील या शिव्यांच्या दुनियेतल्या प्राथमिक शब्दांची ओळख आम्ही प्राथमिक शाळेत गेल्यावरच झाली. त्या आधी ऐकून माहित होतं पण हे शब्द वाईट आहेत व त्यामुळे आपण उच्चारता कामा नयेत असं आमचं आम्हालाच वाटायचं. या पेक्षा वरच्या दर्जाच्या शिव्याही त्यानेळी चाळीतल्या, नळावरच्या भांडणात ऐकायला यायच्या पण त्यांचा अर्थ कळायचं तेंव्हा वयही नव्हतं, पण भेंxx, माxxxx या शिव्यांचं यमक आणि ताल मात्र मनाला त्यावेळी मोहवून जायचं. पण या काहीतरी वेगळ्या शिव्या आहेत व आपण बोलता कामा नयेत असं वाटायचं व मग त्या ऐवजी भेंडी, गवारी अशा त्या शिव्यांशी साधर्म्य सांगणाऱ्या शिव्या आम्ही द्यायचों.
पुढे जसजशा यत्ता वाढत गेल्या तसतश्या शिव्यांची मोहमयी दुनियाही समोर उलगडत गेली. नवनविन दोस्तार मिळाले, ते आपलं बरं-वाईट शब्दभांडार आम्हाला देत गेले व त्यातली खुमारी कळू लागली. वर सांगीतलेल्या भें, मा शिव्याही ह्या नव्या शिव्यांपुढे अगदी ह्या, म्हणजे कायच्या काय मिळमिळीत, वाटू लागल्या आणि पुढे शिवीमिश्रीत वाक्य हा नेहेमी बोलण्याचा भागच बनून गेला. इतका की मी बॅंकेत नोकरीला असताना माझी ओळख ‘ते, भेंxx गणेशजी का?’ अशी होऊ लागली. असं बोलताना आपण त्या ‘गणेशा’चाही उद्धार करत आहोत हे कोणाच्या गांवीही नसायचं..निर्मळ मनाच्या शिव्या हो..कारण शिवी, त्या शिव्यांमधील शब्दांपेक्षा ‘टोन’ने जास्त लागते. अगदी बंदुकीची गोळी सण्णकन लागावी तशी..
पुढे जसजशा भाषा, शब्द यांवरील प्रेम वाढु लागलं तसतशी शिवीबद्दलची समजही वाढू लागली..मग त्यातून जागं झालेल्या कुतुहलातून शिव्यांचा उगम शोधू लागलो आणि त्यातून एकेक अफलातून माहिती हाती लागत गेली.. ‘फाजील’ हा शब्द आपणं एखाद्या आगाऊ कार्टा/ कार्टी साठी वापरतो. वयाच्या मानाने ही पोरं बोलण्यात, वागण्यात फार पुढे असतात. थोडक्यात फाजील हा शब्द आपल्यात थोड्या तीरक्या अर्थानेच वापरला जातो.
प्रथमिक यत्तेतल्या नालायक, बेशरम, फाजील या शिव्या, शिव्या नसुन फारसी/अरबीतले शिवीसदृष शब्द आहेत हे कळलं. त्यातील ज्या ‘फाजील’ या शब्दाला आम्ही लहानपणी शिवी समजायचो तो शब्द मुळ ‘फाझील्’ या अरबी शब्दावरून तयार झालेला असून त्याचं डिक्शनरी मिनिंग विद्वान, शहाणा, हुशार असा आहे.(मराठी व्युत्पत्ती कोष व फार्सी-मराठी कोष) आता बोला.. पुर्वीच्या काळी राजदरबारात एखादी समस्या घेऊन त्यावर वाद-विवाद करण्याची पद्धती होती. त्यात भाग घेणा-या व्यक्तींना ‘फाझील्’ म्हणत असत व त्यावरून मराठीतला ‘फाजील’ हा शब्द आला असावा. वयाच्या मानाने ‘तसंलं’ बोलण्यात फास्ट असलेल्या लहान मुलांसाठीच हा शब्द आपल्याकडे वापरला जायचा. आता हा शब्द लुप्त होत चालला आहे. आम्ही फक्त बोलायचो त्या वयात आता पोरं/पोरी ‘तसला’ फाजीलपणा प्रत्यक्ष करतात असं पेपरमधल्या बातम्यांवरून कळतं आणि आपण फार म्हणजे फारच लवकर जन्माला आलो बुवा असं उगाचच वाटतं.(माझे पुरूष मित्र माझ्याशी सहमत असतीलच. जे नाहित ते खोटं बोलतात असं खुशाल समजावं. काय?)
असंच ‘नालायका’चं देखील आहे. हा देखील फारसी शब्द असून तो मुळ  ‘नालाअीक’ असा आहे. त्याचा अर्थ आपण आता वापरतो तसाच म्हणजे ‘अयोग्य’ असा आहे. मराठी/ हिंदीत हा शब्द याच अर्थाने वापरला जातो. ‘नालायक व बेशरम’ ही जुळी भावंड आहेत आणि ती एकमेकांपासून विलग करता येत नाहीत. ‘बेशरम’ देखील फारसीचं असून त्याचा अर्थ फार्सीतही आपल्यासारखाच आहे..
खरं तरं ‘शिवी’ हा शब्द वरील शब्दांना योग्य नाही. शिवी या शब्दाची व्युत्पत्ती ‘शाप’ या शब्दापासून झाली आहे असं मी ब-याच ठिकाणी वाचलं आहे, पण मला ही व्युत्पत्ती १०० टक्के पटलेली नाही. पुर्वीच्याकाळी कोणी कोणाचा आज्ञाभंग केल्यास वा अपमान केल्यास शाप दिला जायचा. याच ‘शाप’चं काळाच्या ओघात ‘शिवी’ झालं असं मानण्यास हरकत नाही.
शिवी हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो. शिव्यांच्या शब्दांवरून, पद्धतीवरून त्या त्या भागातील संस्कृती समजते. कोकणात तर ‘शिवी’ ही ‘ओवी’ म्हणूनच स्विकारली जाते. शिवी देणा-याला काही वाटत नाही आणि घेणा-याला तर त्याहून काहीच वाटत नाही. इथे प्रत्यक्ष बाप पोराला ‘रांडीच्या किंवा भोसडीच्या’, अगदी त्याच्या आईसमोर बिनदिक्कत म्हणतो(आईही म्हणते अधे-मधे). येथे शब्दाचा अर्थ विचारात घेतला जात नाही तर त्यामागील भावना पाहिली जाते. रत्नागिरी-चिपळूण भागात ‘शिंची’ किंवा ‘शिंच्या’ ही ‘शि(ओ)वी’ खुप वापरली जाते. खरं म्हणजे हा ‘शिंचा’ शब्द ‘शिंदळीच्या’ या शब्दाचा अपभ्रंश आहे आणि ‘शिंदळ’ म्हणजे ठेवलेली बाई किंवा रखेली व तीच्यापासून झालेला तो/तू ‘शिंदळीचा/ची’.
आपल्याकडे बहुतकरून शिव्या आई-बहीणीवरून दिल्या जातात त्याला कारण आपली मुळ मातृसंस्कृती..आईचा-बहिणीचा अपमान आपण आजही सहन करून घेत नाही. आपल्या संस्कृतीत बाप-भाऊ दुय्यम समजत व म्हणून त्यांचा अपमानदर्शक शब्द नाहीत.
शिवी आपल्या आयुष्यात प्रेशर कुकरच्या ‘सेफ्टी व्हॉल्व’ सारखे कार्य करते. जसं प्रेशर कुकर मधे वाफ प्रमाणाबाहेर तयार झाल्यास कुकरचा स्फोट होऊन अपघात होण्याची दाट शक्यता असते परंतू तो अपघात टाळता यावा म्हणून सेफ्टी व्हॉल्वची योजना असते; कुकर फुटण्याऐवजी तो व्हॉल्व फुटतो व अपघात टाळला जातो.  त्याच प्रकारे आपल्याला एखाद्याचा आलेला प्रचंड राग मनात दाबून ठेवण्या ऐवजी व्यक्त करण्यासाठी शिवी हा सेफ्टी व्हॉल्व आहे अन्यथा हृदयावर प्रेशर येऊ शकते.
आपल्या देशातील प्रत्येक प्रांताचं शिव्यांमध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. त्या त्या प्रांतातील अवघं जीवन शिव्यांमध्ये प्रतीबिबित होत असते. तो तो प्रांत समजून घ्यायचा असेल तर प्रथम तेथील शिव्या आत्मसात कराव्यात. गुजरातेतील शिव्या अगदी तेला-तुपात घोळलेल्या ल्किंवा दुध-दह्यात न्हालेल्या असतात तर बंगालातल्या शिव्या त्यांच्या मिठायांसारख्याच गोड भासतात. आपल्यासारख्याला दक्षिणेतल्या भाषांतील बोलणे-ऐकणही आपल्यासारख्याला शिव्यांसारखंच वाटते. मध्य प्रदेश, उत्तर भारतातील उर्दूत तर शिव्या देखील अदबीने दिल्या जातात..’आप जहन्नूम मे जाईये’ या वाक्याला आपणं  शिवी कशी म्हणणार?
मुंबईच्या लोकल ट्रेनमधील लेडीज डब्ब्यातल्या शिव्या हा आणखी एक वेगळाच प्रकार असल्याचं एकून आहे. मी जेन्ट्स असल्याने (मुंबईत पुरूष प्लॅटफाॅर्मवर आणि सार्वजनीक मुतारीत शिरला की त्याचा ‘जेन्ट्स’ होतो) मला काही त्याचा अनुभव नाही परंतू नोकरी करणाऱ्या माझ्या बायकोकडून ऐकून आहे.
खऱ्या अर्थानं तलवारीच्या धारीसारखी सप्पकन वार करण्याची ताकद असलेल्या शिव्या भारतातील फक्त दोन प्रांतात  आहेत..एक आपला महाराष्ट्र आणि दुसरा पंजाब..आपल्या एक एक शिव्या आठवून बघा..नुसत्या शिव्याच नव्हे तर त्या देण्याची लकबही लाजबाब असते..आठवतानाही अंगावर काटा येतो आणि पंजाबी शिव्या ऐकायच्या असतील तर एखाद्या सरदारजी ट्रक ड्रायव्हरची कळ काढून बघा..!!
Xxला घोडा लावणे, गाढव लावणे आदी जनावरांवरून केल्या जाणाऱ्या उद्धारालाही प्रचंड समृद्ध सांस्कृतीक इतिहास आहे आणि तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. पूर्वीच्या काळी एखाद्या राजाने कोणाला जमिन-जहागिरी बक्षिस दिली तर त्या दमिन-जहागिरीच्या सीमांवर राजाची तशी आज्ञा असलेला दगड लानवा जायचा. यी दगडावर घोडा किंवा गाढव स्त्रीशी संभोग करताना दाखवलेला कोरलेला असायचा. याचा अर्थ असा की जो कोणी राजाच्या आज्ञेचा भंग करेल त्याच्या xxला घोडा किंवा गाढव लावला जाईल असा असायचा. या दगड सदृष शिलालेखाला ‘गधेगळ’ म्हणतात व आजही असे अनेक पुरातन गधेगळ पाहायला मिळतात. अश्वमेघ यज्ञ म्हणजे राजस्त्रीचा अश्वाशी प्रतिकात्मक संभोग जेणे करून तिला होणारे पुत्र त्या अश्वासारखे तेजस्वी, किर्तीवान आणि ताकदवान होवोत. घोडा हा पुरूषी ‘ताकदी’चं प्रतिक मानतात व म्हणून केवळ ‘पुरूषां’साठी असलेल्या औषधांवर घोड्याचं ठळक चित्र असतं..
खरंतर एकेका शिवीवर सात-आठशे शब्द लिहिता येतील पण आता पुरतं असं हे शिवीपुराण थोडक्यात आटोपतो.
-नितीन साळुंखे
९३२१८११०९१

 

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..