नवीन लेखन...

खांदा (Sholder Joint)

खांद्याच्या सांध्याला उखळीचा सांधा म्हणता येईल. फऱ्याच्या हाडाच्या उखळीत- दंडाच्या हाडाचे डोके (ह्युमरल हेड) (स्क्युँपुला) फिरते व हा सांधा तयार होतो. परंतु ही उखळ फारच कमी खोल, अधिक पसरट असल्याने दोन गोष्टी होतात. १) या सांध्याच्या हालचाली अधिक व्यापक व सर्व बाजूनी गोलाकार (ग्लोबल) होऊ शकतात- हा फायदा २) उखळ फारच पसरट असल्यामुळे हा खांदा कमी-जास्त, वेडावाकडा ताण पडल्यास पटकन् सटकून बाहेर येऊ शकतो- हा तोटा. असे होऊ नये म्हणून निसर्गाने अनेक युक्त्या योजिल्या आहेत. १) या संपूर्ण सांध्याभोवती जाड आवरण (कॅपसूल) बनवून ते हाडांच्या बाजूला चिकटविले आहे. २) या आवरणाच्या वर तीन बाजूने तीन स्नायू बसविले आहेत. यांना खांदा वळविणारे स्नायू म्हणतात. अ) सबक्यापूल्यारीस- समोर ब) सूप्रास्पायनेटस-वरती क) इन्फ्रास्पायनेटस- मागील बाजूस. या सर्वांच्या वर डेल्टॉइड नावाचा मोठा स्नायू तिन्ही बाजूने या सांध्यावर बसविलेला असतो. आपल्या खांद्याची गोलाई यानेच तयार होते. व्यायामपटुमध्ये हा स्नायू सांध्याला भक्कम आकार देतो. याशिवाय दंडातील बायसेप्स स्नायूचे दोन टेंडनसमोर आणि ट्रायसेक्सचे टेंडन मागील बाजूस असतातच. खांद्याचे उखळ अधिक खोलगट करण्यासाठी आत एक अंडाकृती कास्थि बसविलेली असते. त्यामुळे खांद्यातील हालचाली अधिक सुलभ व सुस्थिर होतात याला लेब्रम म्हणतात. खांद्याच्या हालचाली इतर कोणत्याही सांध्यापेक्षा अधिक प्रमाणात होतात.
त्यामुळेच या सांध्याची स्थिरता इतर सांध्यापेक्षा कमी होते व खांदा निखळणे सहज होऊ शकते. खांद्यातील सांध्यात बऱ्यापैकी चिकट पदार्थ (जॉइन्ट फ्ल्यूईड) तयार होतो व तो तयार करण्यासाठी ग्रंथीचा संच येथेही असतो. खांदा जास्त वापरण्याच्या खेळात म्हणजे क्रिकेट, टेनिस, व्हॉलिबॉल, बेसबॉल, बॅडमिंटन, वजन उचलणे इ. मध्ये खांद्याला इजा होण्याचे प्रकार अधिक शक्य असतात. खांद्याच्या आजुबाजूला ‘स्नायू आणि हाडाच्या मध्ये घर्षण कमी करण्यासाठी पाण्याने भरलेले फुगे (बरसा) बनविलेले आहेत. यात तीन विशेष महत्त्वाचे आहेत. यांना दुखणी झाली तरीही खांद्याची हालचाल कमी होते. अधिक दुःखदायक होते.

मराठी विज्ञान परिषद
-डॉ. सुशील सबनीस

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..