आला, आला, आला श्रावण
उधळीत, उधळीत चैतन्याला
ब्रह्माण्डाला सजवीत सजवीत
आला, आला, आला श्रावण ।।१।।
ऋतूमासांचा सोहळाच आगळा
लोभावतो साऱ्या तनमनहृदया
पांघरित, हरित हिरवाई वसुंधरी
आला, आला, आला, श्रावण ।।२।।
श्रावण सारासारा नयन मनोहर
वेल्हाळ, श्रद्धा,भक्ती सोज्वळ
पंचमहाभूतांचे आविष्कार सुंदर
आला, आला, आला, श्रावण ।।३।।
चिंब चिंबल्या, सात्विक भावनां
अमृती गंगा, श्रावणधारी सिंचन
गंधाळ स्वर्गानंदी,स्पंदनी अविरत
आला, आला, आला, श्रावण ।।४।।
©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १०३.
९ – ८ – २०२१.
Leave a Reply