श्री गंगामाई तूं माते । पावन करिसी सर्वाते ।।
धुवूनी काढसी पापाते । तुझ्या स्पर्शाने ।। १।।
जया होई गंगास्नान । जाईल तो उध्दरुन ।
गंगादेवी पतीत पावन । किर्ति असे तुझी ।।२।।
कहानी ऐका गंगेची । पृथ्वीवरी अवतरण्याची ।।
पराकाष्ठा केली प्रयत्नाची । भगीरथाने ।।३।।
समुद्राचे झाले मंथन । अमृत निघाले त्यांतून ।।
विष्णु कुंभ हाती घेऊन ब्रम्हास दिले ।।४।।
जेव्हां राक्षस मातले । कुंभ घेण्या येवूं लागले ।।
ब्रह्मास कठिण वाटले । त्या क्षणी ।।५।।
विष्णूंनी केला उपदेश । पार्वती बहिण गंगेस ।।
आणूनी तिजला स्वर्गास । अमृत शिंपावे ।।६।।
गंगा होईल आमृतमय । कुंभाची मग भिती न रहाय ।।
पावन करित ती जाय । स्वर्गातील सर्वाते ।।७।।
आमृतमय गंगा झाली । स्वग्रातुन वाहु लागली ।
सर्व देवता संतुष्ट झाली । तिच्या आगमनाने ।।८।।
सुर्यवंशी राजा भगिरथ । करु लागला तप अविरत ।
सामर्थ्य चालले वाढत । तयाचे ।।९।।
तपाची शक्ती महान । तयापुढे नमती सर्वजण ।।
परमेश्वरही देती मान । तपवस्वी पुढे ।।१०।।
तपाच्या लहरी ऊठती । स्वर्गात त्या जाऊं लागती ।।
गंगेच्या चरणीं आदळती । एका मागुनी एक ।।११।।
तप शक्तीच्या लहरी । गंगेस बैचैन करी ।।
धावत गेली श्री हरी । तयासी पुसण्या ।।१२।।
भगीरथाचे तप कठिण । शक्ती त्याची होत महान ।।
सर्वासाठी ते आव्हान । इच्छा सत्वरी पूरवावी ।।१३।।
प्रसन्न झाली गंगादेवी । भगीरथासी दर्शन देई ।।
तुजवर मी प्रसन्न होई । माग वर म्हणाली ।।१४।।
हे माझें गंगाआई । पृथ्वीवरी तूं येई ।।
पातकासी दिलासा देई । ह्या भूमीवर ।।१५।।
भगीरथाची पाहता भक्ती । येण्यासाठी मान्य करिती ।।
सोडून देई स्वर्गाती । पृथ्वीवरी येण्या ।।१६।।
नारद आले स्वर्गातूनी । भगीरथा आशीर्वाद देऊनी ।।
गंगेस रोकती तत्क्षणी । पृथ्वीवरी उडी घेण्या ।।१७।।
हास्य वदन करुनी । दोघांना सागंती समजावूनी ।।
परिणाम उडी घेण्यानी । गंगामाईच्या ।।१८।।
प्रंचड प्रवाह गंगेला । सहन न होई पृथ्वीला ।।
दुभंगुनी जाई पाताळाला । महान शक्ती मुळें ।।१९।।
उपाय एक तयावरी । जर शिव झेलील शिरावरी ।।
नंतर उतरसी पृथ्वीवरी । भार हलका होईल ।।२०।।
प्रसन्न करावे शिवासी । वर मागावा त्यासी ।।
मदत करावी गंगेसी । पृथ्वीवरी येण्याते ।।२१।।
भगीरथ प्रयत्न महान । तपश्चर्या केली कठिण ।।
शिवासी केले प्रसन्न । वर मागुनी घेती ।।२२।।
गंगेची महान शक्ती । पृथ्वी माते न पेलती ।।
घ्यावे तू शिरावरती । उडी घेत समयी।।२३।।
गंगेने उडी घेतली । गंगेने शिरावर झेली ।।
गंगा जटेत सामावली । शिवशक्ति मुळें ।।२४।।
उतरुन प्रथम शिव जटेंत । प्रवाह केला खंडित ।।
नंतर पृथ्वीवरी उतरुनी । वाहु लागली गंगा ।।२५।।
एक द्रूश्य आगळे । गंगेने पृथ्वी प्रदाप्रिले ।।
जमुनी देव सगळे । सोहळा बघती ।।२६।।
स्वर्गातील अमृत । गंगेच्या रुपात ।।
पृथ्वी वरुन वहात । जावू लागले ।।२७।।
पृथ्वीवरील पातक धुतले । तिला पावन केले ।।
पाप नाशिननी संबोधिले । गंगामाईसी ।।२८।।
डॉ.भगवान नागापूरकर
१०- ३०१०८३
( दशहरा म्हणजे दहापापे हरण करणारी. हे गंगानदीचे नांव आहे. ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेपासून ज्येष्ठ शुद्ध दशमी पर्यंत गंगेचे पूजन, अर्चन, गंगास्तूति वाचन, गंगा स्तोत्र पठण, गंगा स्नान, जलपान, गंगावतरणाच्या इतिहासाचे वाचन या पैकी शक्य असेल ते करुन दशहरा उत्सव साजरा करावा )
Leave a Reply