नवीन लेखन...

श्रीकृष्णाचे जीवन

जीवन होते कृष्णाचे आगळे    विविधतेनें भरलेले सगळे

गूढ, घनदाट जंगलापरी    सारे पैलू साकार करी

जंगलामध्यें झाडे वाढती    छोटी छोटी झुडुपे उगवती

पसरे सर्वत्र वेलींच्या जाळी   जल सांचूनी बनली तळी

गोड, आंबट, तुरट फळे    सुंगधी तशीच उग्र फुले

राघू, मैना, ससे, हरणे    तसेंच हिंस्र पशूंचे फिरणे

जंगल दिसते भरलेले पूर्ण    बरे वाईट यांचे चूर्ण

कृष्णाचे जीवन तसेंच नटलेले    चोर ते संतापर्यत गेलेले

चोरी केली, खोड्या केल्या   नटखट बनूनी घागरी फोडल्या

प्रेमिकांचे जाळे भोंवती    नाच नाचला तालावरती

मुरली वाजवूनी गुंगवी    मधूर गीताने डोलवी

राजकारणी म्हणून जगला    युक्तीने नमवी शत्रूला

युद्ध भूमिच्या प्रसंगी    अर्जूनास तो गीता सांगी

सोळा कलांचे रूप मिळाले    पूर्ण अवतारी जीवन जगले.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..