याला काही अग्नीपुत्र तर काही शिवपुत्र मानतात. स्कंद हा अत्यंत पराक्रमी असल्याने इंद्राला वाटले तो आपले राज्य घेईल, म्हणून इंद्राने स्कंदावर वज्र सोडले. यामुळे स्कंदाच्या दक्षिण भागातून विशाखाची उत्पत्ति झाली. या दोघांना पाहून इंद्रासह सर्व घाबरले. स्कंदाने त्यांना अभय दिले ऋषि, इंद्रादिनी त्याला इंद्रपद स्वीकारण्यास सांगितले. तेव्हा स्कंदाने नम्रपणे त्याला नकार दिला. इंद्राने सेनापती पद स्विकारण्यास सांगितले तेव्हा स्कंद नम्रपणे म्हणाला – दानवांच्या नाशासाठी, देवांच्या कार्यसिद्धीसाठी, गोब्राह्मण यांचे हितासाठी मी हे सेनापती पद स्विकारतो. तेव्हापासून हा देवांचा सेनापती झाला. वर सांगितल्याप्रमाणे निरनिराळ्या कथांमुळे याचे उत्सवाचे महिने सुद्धा निरनिराळे येतात. दक्षिणेकडे याला सुब्रह्मण्यम्, मुरुगन असे म्हणतात.
विद्याधर करंदीकर
Leave a Reply