मला आता ‘ स्पेस ‘ ची गरज आहे.
घंटा…स्पेस मी तिला म्हणालो .
अरे स्पेस म्हणजे काय खरा अर्थ कळतो काय ?
मी डाफरलो .
ती म्हणाली ओरडू नकोस , आपण असेच रहातोय ,
मला माहित आहे.
अरे आपल्याला काय कमी आहे. छान रहातो आहे.
तू तुझे बघते , मी माझे.
कुठेही इगो नाही , वाद नाही .
हे नवीन काय .
शांतता हवी आहे तीम्हणाली .
विचार करण्यासाठी ..
त्यासाठी स्पेस.
म्हणजे ब्रेक अप म्हणावयाचे काय.
मी म्हणालो. कारण
पुरुष असो . स्त्री असो .स्पेसचा विचार आला
की त्यापाठोपाठ रिप्लेसमेंटचा ?
त्या पाठोपाठ ब्रेक अपचा
ह्या अशा तीन पायऱ्या प्रचलित आहेत.
मी तिला म्हणालो खरे सांगू आपल्या एकत्र रहाण्याला
तू कंटाळली आहेस बहुतेक.
तुझ्या त्या मैत्रिणीसारखी. ती आत्ता
एकटीच रहाते ना .
मी म्हणालो…तेव्हा ती म्हणाली तसे नाही .
मग कसे मी पण म्हणालो.
खरे सांगू आपण आता एकमेकांना नको तेव्हडे
कळलो आहोत.
जेव्हा आपण नको तेव्हडे एकमेकांना कळतो
तेव्हा हाच घोळ होतो.. अर्थात कुणी स्वतःची किती
पाने उघड करवीत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
तुला ब्रेक अप हवे आहे का ?
ती तसे नाही म्हणाली, परंतु स्पेस हवी आहे..
आयला हा स्पेस हा शब्दच भन्नाट आहे..
तो पुढचे वादळ येणार म्हणून सुचवतो.
खरे तर आमचे मस्त चालले आहे.
परंतु कुठेतरी तोच तोच पण आला आहे.
हे मात्र खरे आहे.
कारण लग्नाचे बंधन नाही ,
दोहांचाही बँक बॅलन्स मजबूत.
तेव्हाच ह्या सस्पेसची भानगड निघते बहुतेक.
मी तिला आज समजावले.
परंतु हा ‘ स्पेश ‘ शब्द मला बरेच काही सांगून गेला..
सुचवून गेला ..
एक वेगळी दिशा दाखवून गेला असेच म्हणावे लागेल..
आजचा दिवस-रात्र मजेत गेली ,
उद्याची-परवाची पण जाईल
पण त्या स्पेस ह्या शब्दाने ने तडा दिला…
त्यावेळी मात्र डोळे मिटल्यावर माझ्या डोळ्यासमोर
हिचा चेहरा किंवा हिचा विचार नेहमीप्रमाणे आला नाही ..
तिची ती कोण मैत्रीण ‘ स्पेस ‘ वाली.
ब्रेक अप वाली.
तिचा चेहरा समोर आला….
अर्थात ही चाहूल होती का हूल होती ?
मला वाटते चाहूलच ……!!!!!!
सतीश चाफेकर
Leave a Reply