३) हळद- वनस्पती शास्त्रातील नाव कर्क्यूमा लाँगा, याचे जमिनीतले खोड म्हणजे हळदकुंड. पुराणकाळापासून मंगलकार्यातील व पाककृतीत मानाचे स्थान. पदार्थांना रंग व चव देणारी हळद आहेच तशी गुणकारी. सांगली सर्वात जास्त हळद पिकविणारी व निर्यात करणारी. पिढ्यान्पिढया हळद कृष्णाकाळच्या भूमिगत गोदामात साठवली जाते. जखम झाल्यास रक्तस्त्राव थांबवण्यासाठी व जंतुप्रतिबंधक म्हणून हळद लावण्याचा प्रघात आहे. हळदीमध्ये लोहाचे प्रमाण सर्व पदार्थापेक्षा अधिक आहे. ६८ मि. ग्रॅ. हे लोह शोषले जाण्यासाठी साहाय्य करणारे मँगनीज ९ मि. ग्रॅ., कॅल्शियम १५० मि. ग्रॅ., फॉस्फरस २८०, जस्त ३ मि. ग्रॅ. प्रतिशत असते. लोह खूप असल्यामुळे पांडुरोगात उपयोगी व एकंदरीत प्रतिकारशक्ती वाढवते. यातील कर्क्युमीन कर्करोगप्रतिबंधक आहे.
४) वेलची- एलिटेरिया कार्डामोमम नावाची एवढीशी वेलची! पाकशास्त्रात व मुखशुद्धीसाठी महत्त्वाचे स्थान, पाकशास्त्रातील पाककृतीत वेलची आवश्यक. काळा मसाला तिच्याशिवाय होत नाही. वेलची उत्तेजक, पाचक, पोटातील वायू कमी करणारी, मळमळ कमी करणारी. लवंगेप्रमाणेच कामवासना वाढवणारी. हे गुणधर्म त्यातील तैलद्रव्यामुळे येतात म्हणून ती थंड ठिकाणी ठेवावी म्हणजे तैलद्रव्ये उडत नाहीत. श्वसनसंस्थेला, पचनसंस्थेला शामक. महत्त्वाचे म्हणजे वेलची बिंबिकेची गुठळी होऊ देत नाही. मादी फुलातून वेलची तयार होते. नर फुले दिसायला सुंदर. वेलचीत प्रतिशत कॅल्शियम, १३० मि. ग्रॅ., फॉस्फरस १६०, मॅग्नेशिअम १७३,
मँगनीज ९ जस्त ३ व कोलीन १५५० मि. ग्रॅ. असते.
५) दालचिनी – सीमॅमोमम झीलॅनिकम या
झाडाची साल. याचा क्रियाशील घटक सीनॅमिक अॅसिड. हे जंतूनाशक आहे. त्यामुळे पूर्वी इजिप्तमध्ये कलेवरांना लेप लावायचे. रोमन लोक अत्तरे व मद्यात उपयोग करतात. आशियाई स्वयंपाकात करतात.
दालचिनीचा अर्क औषधात वापरतात, त्यामुळे पोटातील वायू कमी होऊन पोटदुखी कमी होते. पाचक व भूक प्रज्वलित होते.
६) आले – झिंझीबार ऑफिसीनेलचे भूमिगत खोड. भारत सर्वात जास्त आले पिकवले व निर्यात करतो. मुख्य द्रव्य जींजेरॉल. प्रसाधने, सुवासिक द्रव्ये, शीतपेये यात वापर. पाचक, पोटातील वायू कमी करते. चघळल्यास लाळ सुटते. वार्धक्यात लाळ कमी होऊन तोंडात शुष्कता येते. अशावेळी आवळकट्टी, आलेपाक, चघळावी म्हणजे लाळ सुटून पचनास मदत होते. यात लोह ४ मि. ग्रॅ., मॅग्नेशिअम ४०५, मँगेनीज ५, कॅल्शियम २०, फॉस्फरस ६० मि. ग्रॅ. प्रतिशत असते. आल्यामुळे रक्तातील बिंबिकेची गुठळी होत नाही. कर्करोगप्रतिबंधक, रक्तातील शर्करा कमी करते. यावर अधिक संशोधन चालू आहे.
Leave a Reply